सांगावा, मिरज - सांगली. दि. ८ : अहमदनगर जिल्यातील नगर तालुक्यातील सोनेवाडी ( चास ) या गावचे रहिवासी अभिनेते निर्माता दिग्दर्शक पांडुरंग कुशाबा काळे यांचा मोठा मुलगा व गुरुकुल सैनिकी स्कूल भोसे मिरज सांगली या शाळेचा विध्यार्थी कौस्तुभ पांडुरंग काळे याने शालेय तालुका चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला . कौस्तुभ याने मागील वर्षी २०२३ मध्ये देखील शालेय तालुका स्पर्धेत चालण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला होता. आणि आता याही वर्षी २०२४ साली यंदाही त्याने शालेय याच स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे . आता त्याची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यास पुढील कार्यास सांगावा न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा . प्रशिक्षक म्हणून श्री विशाल माळी यांनी कौस्तुभ साठी खूप कष्ट घेतले . कौस्तुभ पांडुरंग काळे या विद्यार्थ्याचे कौतुक ग्रामस्थ सोनेवाडी आणि गुरुकुल सैनिकी स्कुल भोसे मिरज यांसकडून करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा