Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

प्रस्थापितांना घरी बसवून ' विस्थापितांना ' सत्तेत बसवण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या उमेदवाराला मत द्या ___ संभाजीराजे छत्रपती

आपण कुणाची AB टीम नसून आपला एकच पक्ष शिवराय फुले शाहू आंबेडकर पक्ष ___ दीपक केदार ( पँथर )


पिंपरी विधानसभेचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ आणि चिंचवड विधानसभेचे उमेदवार मारुती भापकर या स्वराज्य पक्षाच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती यांची जाहीर सभा संपन्न 

सांगावा न्युज, पिंपरी. दि. १७ : चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री मारुती भपकर आणि श्री बाळासाहेब ओव्हाळ यांच्या प्रचारार्थ स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराजे छत्रपती यांची पिंपरी येथे भव्य प्रचार सभा झाली. या सभेला प्रचंड संख्येमध्ये नागरिक तसेच विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पाठीमागील मैदानात झालेल्या सभेत हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, तरुण, तरुणींची लक्षवेधी उपस्थिती होती. भव्य दिव्य संपन्न झालेल्या या प्रचार सभेने विरोधकांना नक्कीच घाम फुटला असेल. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेवून पुढे चालणारे भीम अनुयायी आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची विचारधारा घेवून चालणारे वंशज एकत्र येवून स्वराज्याच्या झेंड्याखाली लढताहेत त्याला दोन्ही समाज बांधवांनी भक्कम साथ दिली असल्याचे चित्र आजच्या सभेत दिसले. महायुतीच्या उमेदवारा समोर प्रबळ उमेदवार म्हणून स्वराज्य पक्षाचे उमेदवार हे मजबुतपणे मतदारांसोर उभे आहेत, त्यामुळे जमलेल्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये शंभर टक्के समाविष्ट होईल अशी भावना काही उपस्थित मतदारांनी व्यक्त केली.

" राजर्षी शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भर सभेत या देशाचे बहुजनांचे नेतृत्व करणारा खंभिर नेता म्हणून घोषित केले होते. त्यामुळे शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार आमदार होऊन विधानसभेत गेले पाहिजेत. शाहू महाराज आणि बाबासाहेब एकमेकांच्या सुख दुःखाच्या प्रसंगात एकमेकांना आधार देत होते. तोच आधार आजच्या समाज व्यवस्थेत हरवल्या सारखा दिसतोय. प्रस्थापितांची दहशत गाडून , विस्थापितांच्या कामगार पुत्राला, शेतकरी पुत्राला आपण निवडून द्यावे "

____ संभाजीराजे छत्रपती | अध्यक्ष : स्वराज्य पक्ष  |


" आपण ज्या मैदानात सभा घेत आहोत, त्या समोरील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या डोक्यावरून मेट्रो गेली. डेव्हलपमेंट करतांना डोकी ठिकाणावर ठेवून केली पाहिजेत. महापुरुषांच्या स्मारकांच्या स्थळांची उंची कमी होईल आणि स्मारके झाकली जातील हे कसलं आलंय डेव्हलपमेंट ? उद्या आपल्याला बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवायचे कार्य हाती घ्यायचे आहे. त्या बनसोडे आमदारांनी काय केलं ? बाबासाहेबांच्या स्मारका शेजारी असलेल्या रमाबाईंच्या स्मारकाची जागा आहे. तेथे अजून माता रमाईचे स्मारक का झाले नाही ? लोकं भावना आणि प्रलंबित कामे विद्यमान आमदाराला दिसत नाहीत का ? SRA प्रकल्प उभे करता आणि घरे किती देता ३०० स्क्वेअर फूट !  जनावरांच्या गोठ्या एवढी जागा झोपडपट्टी धारकांना देता काय ? बिल्डरांची घरे भरण्यासाठी गरीबांची घरं छोटी करता काय ? अहो विद्यमान आमदारांच्या बाथरूमची साइज् मोजली तर ती एक हजार स्क्वेअर फूट असेल पण ज्या गरिंबांच्या मतावर विद्यमान आमदार निवडून दिले होते त्या गरिबांची घरे जनावरांच्या गोठ्या पेक्षा लहान ! हे कदापि सहन केले जाणार नाही. आता आम्हाला एक हजार स्क्वेअर फुटांची घरे पाहिजेत नाहीतर त्यांच्या SRA पेक्षा आमच्या झोपड्या बऱ्या. आता जागे व्हा आणि माता रमाईचे भव्य स्मारक करण्यासाठी आणि झोपडपट्टी धारकांना एक हजार स्क्वेअर फूट घरे मिळवण्यासाठी स्वराज्य पक्षाचे उमेदवार निवडून द्या"

___ दीपक केदार | दलीत पँथर |


" एकनाथ शिंदेंच्याच फक्त लाडक्या बहिणी आहेत काय ? इथे जमलेल्या महिला ह्या माझ्या लाडक्या बहिणी नाहीत काय ? आज इथे संभाजीराजे छत्रपतींच्या सभेला उपस्थित आसलेल्या आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेली इथे सहभागी झालेली प्रत्येक महिला ही माझी लाडकी बहिण आहे. तर कोणी माझ्या लाडक्या माय माऊली आहेत. मला आई बाप नाहीत पण ज्या चुलतीने माझा सांभाळ केला. जीच्यामुळे मी आज इथे तुमच्या समोर उभा आहे ती माझी चुलती, आई आणि बहिण दोन्ही आहेत. चुकता माझा बाप आणि भावाच्या भूमिकेत आहे. त्यांच्या साक्षीने सांगतो मी आमदार झालो तर  पात्र असलेल्या लाभधारक गोर गरिबांना ५०० स्केवर फुटांची घरे बांधून देण्यासाठी, आमदार झाल्याच्या चौथ्याच दिवशी इथेच अमरण उपोषणाला बसेल. जोपर्यंत पाचशे फुटांची घरे मंजूर होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. गेली दहा वर्षे जनतेच्या पैशातून भ्रष्टाचार करून मलिदा खाल्लेल्या इथल्या विद्यमान आमदाराने झोपडपट्टी धारकांसाठी काय केले. जिथं SRA प्रकल्पा अंतर्गत घरे बांधली ती राहण्या लायक तरी आहेत का ? मतदार संघात गुन्हेगारी वाढली ती कुणाच्या आशीर्वादाने हे जनतेला माहीत नाही का ? महीलांसाठी इथे सुरक्षित वातावरण आहे का ? भ्रष्टचार आणि दहशतवादी वातावरण नष्ट करायचे असेल आणि भयमुक्त शहर करायचे असेल तर पिंपरी विधानसभा मतदार संघातून मला निवडून द्या"

___बाळासाहेब ओव्हाळ | पिंपरी विधानसभा उमेदवार : स्वराज्य पक्ष |


"स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांच्या चौक सभेच्या परवानग्या नाकारल्या जाताहेत. आमच्या प्रचार रिक्षा जागोजागी अडवून फोडल्या जाताहेत. असे का आणि कुणासाठी ? राजे तुम्हाला सांगतो, SRA मार्फत लाभधारकांना ५०० चौरस फुटांची घरे मिळावीत म्हणून गेली पाच वर्षापासून आम्ही अर्ज विनंत्या करतोय. तरीही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या सत्ता उपभोगलेल्या लोकांना घाम फुटत नाही. म्हणून पिंपरी आणि चिंचवड मधून स्वराज्य पक्षाचे दोन्ही उमेदवार बहुमतांनी निवडून द्यावेत असे जनतेला आवाहन करतो" 

___मारुती भापकर | उमेदवार : चिंचवड विधानसभा मतदारसंघ |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा