Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

चिंचवड मतदार संघातील शिव सेना भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी ?

 भाऊसाहेब भोईर हे माझे राजकीय गुरू __ अनंत कोऱ्हाळे ( शिवसेना : ठाकरे गट )

शिवसेनेचे ( ठाकरे गट ) अनंत कोऱ्हाळे यांचा अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा 

सांगावा न्युज, चिंचवड. दि. ११ : चिंचवड शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गट ) विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. या पुढे एक पाऊल टाकत त्यांनी स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयात भाऊसाहेब भोईर यांच्या निवडणूक कार्यालयासाठी दिले आहे. हे कार्यालय अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची चिंचवड येथील मध्येवर्ती काचेरी असेल त्याचे उद्घाटन उद्या दिनांक १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत श्री अनंत कोराळे यांनी दिली.

भाऊसाहेब भोईर यांच्या उमेदवारी मुळे चिंचवड निवडणूक कमालीची चुरशीची झाली आहे. आजच्या घडामोडी नंतर तर निवडणुकीचे वारे बदलले आहेत असेच चित्र आहे. सुमारे पावणेसात लाख मतदार असलेल्या या भल्या मोठ्या मतदार संघात सर्व उमेदवारांनी आपली ताकद पणास लावली आहे. तीस हून अधिक वर्षांचा राजकीय अनुभव आणि प्रचंड जनसंपर्क याच्या जोरावर निवडणुकीत उतरलेल्या भाऊसाहेबांना आता मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. काल मुस्लिम समाजाच्या मोठ्या गटाने दाखवलेला उत्साह आणि आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या नेत्याने दिलेला पाठिंबा या मुळे त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. पुढील काही दिवसात आणखी काही मोठ्या घडामोडींची अपेक्षा आहे असे भाऊसाहेबांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या संदर्भात भाऊसाहेब यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहोत एवढेच मी आत्ता तुम्हाला सांगू शकतो.

" भाऊसाहेब भोईर हे माझ्या राजकीय जीवनातील गुरू आहेत. एवढेच नव्हे तर माझ्या मोठ्या बंधू प्रमाणे माझ्या पाठीशी राहतात वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करीत असतात. मी जरी शिवसेनेचा असलो तरी मी माझा व्यक्तिगत निर्णय घेवून चिंचवड चे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा देत आहे. मी चिंचवडचा असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना वाटते की आपल्या चिंचवडचा आमदार झाला पाहिजे. म्हणून मी आज पत्रकार परिषद घेवून पाठिंबा जाहीर करतोय. उद्या माझे कार्यालय भाऊसाहेबांचे मध्यवर्ती निवडणूक कार्यालय असेल त्याचे उद्घाटन उद्या संपन्न होईल" ___ अनंत कोऱ्हाळे ( माजी नगरसेवक : शिव सेना - उध्दव बाळासाहेब ठाकरे )
Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा