Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

प्रशांत जगताप यांचा घरोघरी जावून प्रचार सुरु

 लोकांचा उदंड प्रतिसाद 


प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ जयंत पाटलांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी 

सांगावा न्युज, पुणे. दि. ११ : काल कात्रज या ठिकाणी माहाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांची जाहीर सभा झाली. त्या सभेला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. अशा मोठ मोठ्या सभा होत असतांनाच सुरुवातीपासूनच प्रशांत जगताप यांनी मतदार संघात घरोघरी जावून प्रचाराला सुरुवात केली आहे. नागरिक मनपूर्वक त्यांचे स्वागत करीत असून प्रचारात प्रशांत जगताप आघाडीवर झाल्याचे चित्र दिसत आहे 

हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप बुधवार पासूनच आपल्या जाहीर प्रचाराला भव्य शुभारंभ केला आहे. भोसले गार्डन, हडपसर येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाने हा कार्यक्रम सुरू झाला. मतदारसंघातील प्रचाराच्या सर्व कामांचे समन्वयन केले असून सुनियोजित प्रचार सुरू आहे. . सर्व आघडीतील पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून प्रचारामध्ये गती आली आहे.

“महाविकास आघाडीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्व स्तरातील लोक आमच्या मागे धावत आहेत. मतदारांना वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी आम्ही घरोघरी भेटी देत आहोत. सर्व सहयोगी महाविकास आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते, तसेच रिपब्लिकन, पुरोगामी आणि समानता-केंद्रित संघटनांचे समर्थक, ' तुतारी वाजवणारा माणूस' हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत."

__ प्रशांत जगताप ( महाविकस आघाडी उमेदवार : हडपसर मतदारसंघ 

)

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा