Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

प्रत्यक्ष घरो-घरी जावून मतदारांशी साधला जातोय सुसंवाद ____ भाऊसाहेब भोईर

 चिंचवड मतदार संघातून भाऊसाहेब भोईर यांना विविध संघटनांचा पाठिंबा !


सांगावा न्युज, चिंचवड. दि. ९ : प्रचार शुभारंभ झाल्यापासून आजर्यंत प्रचाराच्या पूर्वार्धात प्रत्यक्ष मतदारांना जावून भेटणे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्यावर भर देत चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार श्री भाऊसाहेब भोईर आपला प्रचार करीत आहेत. आज सकाळच्या सत्रात वल्हेकरवाडी परिसरातील मतदार बंधू भगिनींच्या गाठी भेटी घेवून संवाद साधला. यावेळी भाऊसाहेब भोईर युवा मित्र मंडळाच्या कर्त्यांसहा ईतर मान्यवर देखील उपस्थित होते.

आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात तांत्रिक दृष्ट्या आपण प्रगत झालो असलो तरी माणसां - माणसातील संवाद दुरावत चालला आहे. तो प्रत्यक्ष भेटीतून घडावा अंक त्यातून आपल्यातील स्नेह वाढत जवा याच उद्देशाने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात जन जनसंवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष लोकांच्या घरी जावून भेटी घेतल्या जात आहेत. यातून आपलेपणा जाणवतो, बंधुभाव जोपासला जातो. निवडणुका असो किंवा नसो तरीही भाऊसाहेबांचा जनसंवाद सुरू असतोच, पण सध्या संवादा बरोबरच लोकांच्या मतांचा मोठा पाठिंबा हवाय. सुसंवादाचे रूपांतर मतदानात व्हावे अशी भावना यावेळी उपस्थित आसलेल्या जनतेने व्यक्त केली. भाऊसाहेबांनी तयार केलेल्या चिंचवड विकासाच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे आपल्या मतदारसंघाचा विकास करून घ्यायचा असेल तर जनतेने कपाट चिन्हासमोरील बटण दाबून श्री भाऊसाहेब भोईर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आता आपण जनतेने हाती घेतली पाहिजे अशा प्रतिक्रिया वल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांशी असलेला दांडगा जनसंपर्क यंदा भाऊसाहेबांना आमदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत अशा भावना देखील उपस्थित मतदारांनी यावेळी बोलून दाखवल्या. लोकं आता उत्स्पूर्तपणे आपल्या प्रचारात सहभागी होताहेत त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत असल्याचे यावेळी भाऊसाहेबांनी मत व्यक्त केले. 

संदीप भालके , आशिष कोर्टेकर , सुरज शिंदे , अरुण पवार , शुभम झोंबाडे , विशाल जाधव , दत्ता जाधव , अनिकेत भोगे , गणेश कवडे , बाळासाहेब वाल्हेकर , तात्या आहेर , श्रीधर  वालेकर , अशोक भालके , संदीप भालके , पोपट शिवले , सत्यवान शिवले , गोपाल दगडे , सुधीर हनवते , रमेश अवटी , अरुण पवार , आबा वाल्हेकर , ज्ञानेश्वर शिवले , राजेंद्र अवटी , बाळासाहेब वाल्हेकर, अशोक वाल्हेकर , गणेश कवडे इत्यादी मान्यवर भेटी गाठीत सहभागी होते.

" मतदार स्वतः हून आपल्या प्रचार सभेत सहभागी होताहेत. यावरून असं जाणवतंय की चिंचवड मतदार संघात नागरिकांना आता बदल हवा आहे. आणि त्यासाठी माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तिमत्त्वाला आपला लोकप्रतिनिधी म्हणून लोकं पहात आहेत. माझ्या बाजूने असलेल्या या सकारात्मक बाजू आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करीत असताना प्रत्यक्ष काम करण्यासाठी जनता मला विधानसभेत पाठवतील असा विश्वास आहे"

____ भाऊसाहेब भोईर ( अपक्ष उमेदवार : चिंचवड विधानसभा मतदारसंघ )

Advertisement 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा