सांगावा, पिंपरी. दि. १७ : पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सुलक्षणा धर शिलवंत या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांची आज बाईक रॅली संपन्न झाली. दापोडी पासून सुरू झालेल्या बाईक रॅलीचा पिंपरी येथे सांगता समारोप झाला. या बाईक रॅली मध्ये प्रचंड संख्येने लोकं सहभागी झाले होती. प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिले असून पिंपरी विधानसभा मतदार संघात सुलक्षणा धर शिलवंत यांनी प्रचारत आघाडी घेलेली आढळते.
"माझ्या प्रचारार्थ दापोडी येथून सुरू झालेली बाईक रॅली मोठ्या जल्लोषात पिंपरीला येऊन पोहचली आहे. या रॅलीला कार्यकर्ते, माता भगिनी, ज्येष्ठ, तरुण सर्व वयोगटातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. शुभेच्छांचा वर्षाव, जिव्हाळा आणि प्रेम प्रचंड बळ देणारे आहे"
___सुलक्षणा धर शिलवंत | पिंपरी विधनसभा | उमेदवार महाविकास आघाडी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा