मेगास्टार अल्लु अर्जुनाला पोलिसांनी का घेतले ताब्यात ?
सांगावा न्यूज, तेलंगणा. दिनांक १३ : मेगास्टार दाक्षिणात्य अभेनेता अल्लु अर्जुन यांना आज पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या देशभर झळकत आहेत. यातच अल्लु अर्जुन च्या चाहत्यांना धक्का बसला असून नेमकं आपल्या हिरोला पोलिसांनी अटक केले की तांब्यात घेतले हा संभ्रम कायम आहे. काही नॅशनल खाजगी वृत्तवाहिन्यांवर अल्लु अर्जुनला अटक केल्याच्या बातम्या दाखवायला सुरुवात केली आहे तर काहींनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या दाखवल्या आहेत.
अल्लु अर्जुन यांना पोलिसांनी ताब्यात घेणे असो किंवा अटक कारणे असो हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात. तेलंगणा राज्यातील संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी अल्लु अर्जुन मुख्य भूमिकेत असलेला सुप्रसिद्ध सिनेमा पुष्पा २ चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. यावेळी सिने क्षेत्रातील मोठ मोठे स्टार्स येणार असल्याने आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले मेगास्टार अल्लु अर्जुन येणार असल्याने चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली त्यातच एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे थिएटर मॅनेजमेंट आणि चित्रपट व्यवस्थापन यांच्या विरोधात त्या महिलेच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. आपला त्यात काही दोष नाही , सिनेमा फॉर्ममध्ये असल्याने कलाकारांची धावपळ पाहता आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच आपली अटक पुढे ढकलावी अशा आशयाची याचिका अभिनेता अल्लु अर्जुन यांनी न्यायालयात दिली होती. दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांना अल्लु अर्जुन यांनी काही आर्थिक मदत केल्याच्या बातम्या देखील लोकांसमोर उघड झाल्या आहेत. परंतु आज न्यायालयाच्या सांगण्यावरून अल्लु अर्जुन यांना पोलिसांनी संपर्क साधून पोलीस स्टेशन मध्ये आणले आहे.
पुष्पा २ सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या प्रेक्षकांच्या गदारोळात चेंगराचेंगरित एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. परंतु चौकशी दरम्यान तीन तासांच्या घडामोडीमध्ये त्यांना अटक करून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर अल्लु अर्जुन यांना जमीन मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा