दिवसा विजेचा लपंडाव ! रात्री शेतीला पाणी द्यावं तर बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी त्रस्त
सांगाव न्यूज, भूम. दिनांक १२ : गेल्या पंधरा दिवसांपासून भूम तालुक्यातील काही गावांच्या शेती शिवारामध्ये बिबट्या आढळून आल्याचे शेतकरी सांगत आहेत. यासंदर्भात वनविभागाला कळविले असले तरीही परिसरातील बिबट्या जेरबंद करून त्याची योग्य व्यवस्था लावण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यातच शेतीला पाणी द्यायचं म्हटलं तर भूम - परांडा - वाशी या तिन्ही तालुक्यात बहुसंख्य गावांमध्ये दिवसा विजेचा लपंडाव असतो. फारच कमी वेळ वीज राहते तर सतत ये जा करत असते असे येथील विजेचे चित्र. दिवसा पूर्ण वेळ अखंडित वीज मिळत नसल्यामुळे रात्री शेतात दारी धरल्या शिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरत नाही. त्यातच या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने रात्री अपरात्री जीव मुठीत घेवून शेतकऱ्यांना शेती करावी लगत आहे. शिवाय इतर विचू काड्याची भीती आहेच. या अशा परिस्थितीमुळे शेतकरी हवालदील झाला असून काय करावे काही सुचत नाही. पूर्ण वेळ लाईट द्यायचीच असेल तर ती दिवसाही द्यावी नाहीतर सरकारने मोठाडपनाच्या टापा हाणू नयेत अशी येथील शेतकऱ्यांची भावना आहे.
प्रशासन रात्री पूर्ण वेळ वीज देतय त्यामुळे या भागातील शेतकरी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच शेतात कामं करतात. अशा रात्री अपरात्री शेतकऱ्यांच्या जिवाला धोका झाला आणि काही नुचीत प्रकार घडला तर याला पूर्णपणे सरकार आणि संबंधित प्रशासन जबाबदार असेल अशा संतप्त भावना भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा