सांगावा न्युज, भोसरी. दिनांक ११ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने भोसरी विधानसभा मतदार संघातील गव्हाणे वस्ती येथील एका प्रार्थनास्थळाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. कोणताही अनूचित प्रकार न घडता बुलडोझर फिरवण्यात आला. धार्मिक श्रद्धांचा दिखावा करीत, निर्माण केलेल्या येथील बेकायदेशीर बांधकामावर पोलीस बंदोबस्तामध्ये धडक कारवाई केली असल्याची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सोशल माध्येमावर फोटोसहित पोस्ट केली.
आमदार महेश लांडगे त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर व्यक्त होतांना सांगतात की, वास्तविक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित 'मदर अँड चाइल्ड क्लिनिक'च्या जागेत आणि न्यायालयात वाद सुरू असतानाही सदर प्रार्थनास्थळाच्या विस्ताराचे काम सुरू होते. असे सांगून या घटनेकडे जनतेचे लक्ष आमदारांनी वेधले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा