बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे निदर्शनास ! शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर __आमदार : महेश लांडगे
सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड, दि. ९ : चिखली कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊलला आज आग लागली. धुरांचे लोट च्या लोट ढगांमध्ये झेपा घेतांना सर्वदूर दिसले. याच बरोबर यापरिसरत बांगलादेशी रोहिंगे घुसखोरी करून राहत असल्याचेही आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये सांगितले. येथे वाढत्या अनधिकृत भंगार गोडाऊनची संख्या अशा आगीच्या दुर्घटनांना जबाबदार असल्याचेही प्रथम दर्शनी दिसत असून परिसरात वाढती बांगलादेशी रोहिंगे यांची घुसखोरी देखील चिंतेची बाब असल्याचे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. प्रशासन अशा अनधिकृत भंगार दुकानावर कारवाई करीत आहे परंतु पुन्हा पुन्हा हे अनधिकृत भंगार व्यवसाय गोडाऊन वाढतच आहेत. यावर देखील आमदारांनी लक्ष वेधले.
" या परिसरात घुसखोरी करून राहत असलेले बांगलादेशी रोहिंगे ही पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची बाब असून यासंदर्भात सखोल चौकशी करून यांच्यावर योग्य ती कारवाई करून घुसखोरी थांबवण्यात यावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, त्याचा पाठपुरावा देखील केला जाईल. पोलीस प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांनी मिळून एकत्रित प्लॅन करून ॲक्शन झाली पाहिजे जेणेकरून घुसखोरांना चाप बसेल. यासाठी पाठपुरावा चालू असून पिंपरी चिंचवडकरांना शब्द देतो की येत्या काळात लवकरच अशा घुसखोरांना पिटाळून लावण्यात येईल. यासाठी फास्ट ट्रॅक वर कार्य सुरू केले जाईल. शहराच्या आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असेल तर सर्व प्रशासन व सुरक्षा यंत्रणेला एकत्र आणून याचा बंदोबस्त केला जाईल " ___ महेश लांडगे ( आमदार )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा