सांगावा न्युज, पिंपरी चिंचवड. दि. ९ : महानगर पालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कचरा टाकून घाण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ३२,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर पासून ते डिसेंबर २०२४ च्या आजच्या तारखे पर्यंत ड क्षेत्रीय हद्दीतील वेगवेगळ्या भागात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सह. आरोग्य अधिकारी शांताराम माने यांनी माहिती दिली.
नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. स्वमअ-२०१७/प्र.क्र. २५६/नवि-३४, दि. ७/०९/२०१८ अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६च्या तरतुदींचे अनुपालन न करणा-या व्यक्ती / संस्थाना दंड (Spot Fine) करण्याचे अधिकार महानगरपालिकांना प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य विघातक कृत्य करणा-या नागरीकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कारवाई करुन दंड वसुली करणेत येते.
त्यानुषंगाने 'ड' क्षेत्रीय कार्यक्षेत्रामध्ये रात्रीचे वेळीस परिसर अस्वच्छ करणा-या तसेच आरोग्य विघातक कृत्य करणा-या नागरीकांवर / अस्थापनांवर कारवाई करणेकामी विशेष पथकाची नियुक्ती करणेत आली असून सदर पथकाद्वारे आरोग्य विघातक कृत्य करणा-या नागरीकांवर विशेष करुन रात्रीचे वेळेस मनपा हद्दीबाहेरील हिंजवडी, देहूरोड, मामुर्डी इ. परिसरातून तसेच हॉकर्स मार्फत मनपा कार्यक्षेत्रामध्ये कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणा-या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करुन एकुण र.रु. ३२,०००/- दंड वसूल करण्यात आला आहे.
यामुळे मनपा हद्दी बाहेरून मनपा परिसरात कचरा टाकणा-या नागरीकांना आळा बसणार असून आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ राखणेस मदत होत आहे. सदरची मोहिम ही 'ड' क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी मा. श्रीकांत कोळप, सहा. आरोग्याधिकारी श्री. शांताराम माने यांचे मार्गदर्शनाखील पार पाडली जात असून त्याचा मुख्य उद्देश हा नागरीकांना आरोग्याचे दृष्टीने चांगल्या सवयी लावणे व अपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ राहील याची दक्षता घेणे हा आहे. सदर पथकामध्ये मनपा आरोग्य कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी काम करत असून त्यांचेवर आरोग्य निरिक्षक / मुख्य आरोग्य निरिक्षक यांचे नियंत्रण आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा