Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले थांबविण्यात गृहखात्याला अपयश : पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर वार _____ विनय सोनवणे

पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर सांगलीतील विटा येथे कोयत्याने हल्ला !

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १४ : भारत हा प्रजासत्ताक देश आहे आणि प्रजेच्या समस्यांना वाचा फोडून शासन प्रशासनाला जन कल्याणकारी कार्य करण्यास भाग पाडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे पत्रकार आहे. लोकशाही राज्य व्यवस्थेत शासन प्रशासनाच्या चांगल्या आणि वाईट कार्याचे वर्तांकर करून लोकांपर्यंत बातमी पोहचवण्याचे आणि लोकांचा आवाज म्हणून शासन दरबारी बातमी पोहचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य कत्रकर करीत असतो. अशा या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर काही गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच काही इतर लोकांकडून हल्ले होत असतील तर ही खूप गांभिर्यची आणि चिंताजनक बाब आहे. काल दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर काही कंठकांनी कोयत्यानं हल्ला केला. या हल्ल्या विरोधात उत्तर म्हणून सनदशीर मार्गाने सांगली, विटा येथील मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांनी पोलीस विभागाला निवेदन दीले व पत्रकारांची एकजूट दाखवली.

पत्रकारांवर होत असलेल्या या हल्ल्या विरोधात सांगलीतील पत्रकार एकत्र आले. पत्रकाराच्या मदतीला पत्रकाराने जाणे ही एकजूट वाखाणण्याजोगी आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्रातील सर्व इतर पत्रकार श्री पिसाळ यांच्या बरोबर आहेतच. परंतु महाराष्ट्र सरकार गृह विभाग पत्रकारांच्या संरक्षणासाठी सतर्क असले पाहिजे. पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून अशा हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील पक्ष आणि संघटना, तसेच सामाजिक व इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनांनी देखील पत्रकारांच्या 

पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. पत्रकारांवर हल्ले होत राहिले आणि समाज नागरिक म्हणून आपण केवळ बघ्याची भूमिका घेवून गप्प राहिलो तर एक दिवस लोकशाही धोक्यात येईल. गुंडागर्दी फोफावेल आणि कायद्याचं राज्य राहणार नाही. जन कल्याणकारी राज्यव्यवस्था सुरळीत चालावी असे नागरिक म्हणून प्रत्येकाला वाटत असेल तर लोकांनी देखील लोकचळवळीचा भाग म्हणून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात सनदशीर मार्गाने आवाज उठवला पाहिजे. 

विटा येथील सद्याच्या या घटने अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या बातम्या आपल्या समोर आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने आणि विशेषतः गृह मंत्रालयाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून 'पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची ' कडक अंमलबजावनी करून हल्लेखोरांना चाप बसवला पाहिजे. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचे नोटीफीकेशन काढून राज्यातील प्रत्येक पोलीस आयुक्तालयाला आणि पोलीस स्टेशनला पाठवून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे लेखी आदेश द्यावेत. विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर जो कुणी हल्ला केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषद आणि मराठी पत्रकार परिषद मुंबई पत्रकारांच्या सोबत सदैव राहील. मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे यांच्या सह पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले आणि सदस्य पत्रकार पदाधिकारी येत्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेवून पत्रकारांच्या संरक्षणासाठी ' पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी ' संदर्भात लेखी निवेदन देणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा