| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १३ : शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडून ५० पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करून त्याच्याकडून २३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदी दागिने घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकुण रु. १७,०७,०००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला गेला. चार फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हासोब गेट येथे त्या गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश आले.
दि. ०४/०२/२०२५ रोजी शिवाजीनगर पो.स्टे. हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक. श्री अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिवाजीनगर पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर २१२/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०५ (क), ३३१(४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा म्हसोबा गेट बस स्टॉप, शिवाजीनगर पुणे येथे थांबलेला असुन त्याने ठिकठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत. अशी खात्रीलायक बातमी प्राप्त होताच सदर बातमी बाबत शिवाजीनगर पो.स्टे. चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना कळविली असता, आरोपी संबंधी मिळालेल्या बातमीचे गांभीर्य ओळखून श्री. सावंत यांनी नियोजनबध्दरीत्या म्हसोबागेट परिसरामध्ये त्याचा शोध घेवून सापळा रचुन त्यास जागीच ताब्यात घेणे बाबतचे आदेश दिले. त्याप्रमाणे नमुद आरोपीस सापळा रचून ताब्यात घेतले.हर्षद गुलाब पवार वय ३१ वर्ष , घोटावडे फाटा, मुळशी जि. पुणे असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहिती पत्रकात सांगितले.
आरोपीची झडती घेतली असता त्याचे सॅक मध्ये सोने-चांदीचे दागिने मिळूण आले तसेच घरफोडी करण्याचे साहित्य मिळुण आले. त्याने अजुन बऱ्याच ठिकाणी घरफोडी केल्याचे सागितल्याने त्यास सदर गुन्ह्यामध्ये दि. ०४/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त साो मा. अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त साो मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक मा. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त साो, परि. १ मा. संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग मा. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे शिवाजीनगर पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, सहा. पोलीस निरीक्षक संजय पांढरे, पोलीस उप-निरीक्षक अजित बडे, तसेच पोहवा रुपेश वाघमारे, पोहवा भाऊ चव्हाण, पोहवा, प्रमोद मोहिते, पोहवा. राजकिरण पवार, पोहवा. महावीर बलटे, पोना. सचिन जाधव, पोशि. प्रविण दडस, पोशि. सुदाम तायडे, पोशि. कृष्णा सांगवे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि. अजित बडे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा