Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कुठल्याच रुग्णालयात ' युरोलॉजिस्ट ' नाही ! अनेक पेशंटचे आरोग्य धोक्यात !

 ' मूत्ररोगतज्ज्ञ ' महापालिका हॉस्पिटल्स मध्ये नसणे हे आर्थिक सशक्त असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट 
' स्पेशालिस्ट डॉक्टर नाही ' यावरून पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या आरोग्याच्या बाबतीत पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता उघड 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १२ : महानगरपालिकेचे नवीन थेरगाव हॉस्पिटल मध्ये पोटात खूप दुखतयं असह्य वेदना होतात म्हणून पेशंट येतो. तपासणी केल्यानंतर किडनी स्टोन असल्याचे लक्षात येते.  येथील हॉस्पिटल मध्ये एक रात्र पेशंटला ठेवून याचा उपचार होत नाही म्हणून पेन किलर देवून पेशंटला वाय.सी. एम हॉस्पिटल मध्ये रेफर करून पाठवले जाते. असह्य होणाऱ्या वेदने सह पेशंट नातेवाईकाच्या साहाय्याने वाय.सी. एम हॉस्पिटल मध्ये. तिथेही इतर विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी आलेल्या भल्या मोठ्या रुग्णांच्या रांगेचा सामना करून पेशंट ओ पी डी मध्ये येतो. तेथील डॉक्टर सांगतात की संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी आपल्याकडे स्पेशालिस्ट डोक्यात नाही. विचारणा केली असता हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून कळते की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कुठल्याच हॉस्पिटल मध्ये याचा उपचार होणार नाही कारण त्यासाठी आपल्याकडे युरोलॉजिस्ट नाहीत. सांगा अशा वेळी त्या आर्थिक दुर्बल घटकातील पेशंटने काय करावे ? त्या पेशंटचे वय केवळ सात. अशा समस्या असलेल्या अनेक गरीब पेशंटचे उपचार बलाढ्य उपचार खर्च असणाऱ्या हॉस्पिटल मध्ये नातेवाईक करू शकतील काय ? महापालिकेची सरकारी रुग्णालये पेशंटला माफक दरात सेवा देण्यासाठी उभी केली आहेत तर मग त्या ठिकाणी गरजेचे डॉक्टर्स का नाहीत ? तेही आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयात संबंधित स्पेशालिस्ट डॉक्टर नाही ही गोष्ट संतापजनक आणि आश्चर्यकारक आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेलच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, तालेरा रुग्णालय या मोठ मोठ्या हॉस्पिटल सह इतर कुठल्याच पिंपरी चिंचवड महापालिका हॉस्पिटल मध्ये काही आजारांवर उपचार करण्यासाठी संबंधित स्पेशालिस्ट डॉक्टर नाहीत. त्या त्या रोगांवर इलाज करण्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर्स लवकरात लवकर भरती करावेत अशी मागणी सामान्य पेशंट आणि नागरिकांची आहे.

# नागरिकांच्या दृष्टीने ' युरोलॉजिस्ट ' आणि त्यांचे महत्त्व किती आहे ते जाणून घेऊयात.

युरोलॉजिस्ट : मूत्ररोगतज्ज्ञ हे मूत्रमार्ग , पुरुष प्रजनन प्रणालीशी संबंधित विकारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन करणारे तज्ञ असतात.

मूत्रमार्गाचे संक्रमण, मूत्रपिंडातील खडा, प्रोस्टेट समस्या, युरीन सिस्टम बिघडलेले असेल त्यावर उपचार कार्य, वंध्यत्व , मूत्रमार्ग तसेच पुनरुत्पादक अवयवांची चिकित्सा आणि यासंबंधी कर्करोग यासारख्या विस्तृत परिस्थितीत सल्ले व उपचार करणारे हे युरोलॉजिस्ट डॉक्टर्स असतात.जटिल मूत्रविज्ञानविषयक समस्यांचे निराकरण करण्यात मूत्ररोगतज्ज्ञ यांची महत्त्वाची भूमिका असते.

* मूत्रपिंडातील खडे : एखाद्याला किडनी स्टोन झाला तर युरोलॉजिस्टच्या सल्ल्यानं उपचार करून मुत खडा बाजूला काढला जाती. कधी कधी युरोसर्जन ऑपरेशन करून मुट खद्यापासून पेशंटची सुटका करतात.

* वंध्यत्व : गर्भधारणेच्या समस्या असतील तर अशा परिस्थितीत युरोलॉजिस्टचे ओपिनियन घेतले जाते.

* प्रोस्टेट समस्या :  लवारंवार लघवी होणे, मूत्राशय रिकामे करण्यात अडचण येणे किंवा पेल्विक भागात वेदना तसेच अस्वस्थता यासारखी लक्षणे जाणवत असतील तर ते सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (BPH) किंवा प्रोस्टेट कर्करोगासारख्या प्रोस्टेट समस्यांशी संबंधित असू शकते. यावर उपचार करण्यासाठी युरोलॉजिस्टचा महत्त्वाचा रोल असतो.

* मूत्रमार्गाचे संसर्ग , लघवी करण्यास त्रास होणे , वेदना किंवा जळजळ होत असेल, तसेच मूत्रमार्गाच्या संसर्गासारख्या विविध आजारांवर मूत्ररोगतज्ज्ञ तपासणी, निदान आणि उपचार करू शकतात.

अशा पद्धतीने रुग्णांची उपचार सेवा करण्यात युरोलॉजिस्टची गरज असताना देखील आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असलेल्या पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या एकाही रुग्णालयात ' युरोलॉजिस्ट ' नाही ही दुर्दैवाची आणि खेदाची बाब आहे. मुत्रविकर रोग तज्ञ ' युरोलॉजिस्ट ' आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटल्स मध्ये असावा असे एकाही सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकांना वाटू नये यात या नामोल्लेख केलेल्या सर्वांचे अपयश आहे. पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या आरोग्याच्या बाबतीत पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी किती उदासीन आहेत यावरून सिद्ध होते.

" आपल्या कडे युरोलॉजिस्ट किंवा युरोसर्जन नाहीत. सबंधित आजारांची पेशंट संख्य लक्षात घेता अशा स्पेशालिस्ट डॉक्टर्सना पेमेंट करणे परवडत नाही. तरीदेखील आम्ही पुढील सहा महिन्याच्या आत महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात युरोलॉजिस्ट आपॉइंट करतोय. जेणेकरून सबंधित आजारांच्या रुगांना सेवा देता येईल "

____ डॉ. लक्ष्मण गोफने 

( मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा