Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६७ तक्रार वजा सूचना

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली


| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक २८ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे २१, ४, ६, ६, १०, ३ आणि १७ अशा एकूण ६७ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. तसेच इ प्रभागामध्ये एकही तक्रार प्राप्त झाली नाही. 

* यावेळी नागरिकांनी पावसाळा सुरू होण्यापुर्वी नाले साफसफाईचे काम पुर्ण करणे, 

* विविध ठिकाणी सुरू असलेले ड्रेनेज लाईन दुरूस्तीचे काम लवकरात लवकर पुर्ण करणे, 

* पाणीपुरवठा योग्य दाबाने करणे, 

* सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणे, * उद्यानांमधील मोडकळीस आलेले व्यायामाचे साहित्य दुरूस्त करणे, 

* फुटपाथवरील अतिक्रमणे हटविणे, 

* रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवे दुरूस्त करणे 

इत्यादी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. 

दरम्यान, आज सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या सेवा हक्काबाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरिता महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसेवा सेवा हक्क दिनाची शपथ देखील यावेळी घेतली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा