| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २९ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार थेरगाव तसेच वाल्हेकरवाडी परिसरातील रहिवासी भागातून नवीन रस्ते प्रस्तावित आहेत. यामध्ये हजारो घरे बाधित होऊन कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सदर विकास आराखड्याला नागरिकांचा तीव्र विरोध असून पर्यायी रस्ते असताना नागरिकांची घरे पडून पुन्हा नवीन रस्ते कशाला करता असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत. याच संदर्भात आमदार शंकर जगताप यांच्याकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्याविषयी नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार चिंचवड मतदार संघातील विविध भागात नागरिकांचे मेळावे घेऊन प्रत्यक्ष भेटून सूचना व हरकती घेण्याची मोहीम चालू असून दोन दिवसापूर्वी वाल्हेकरवाडी येथे बैठक झाली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा