सांगावा न्यूजच्या बातमीची दखल घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या लेखी पत्राने भूम - पुणे, पिंपरी चिंचवड असा प्रवाशांना योग्य मार्गावर प्रवास करता येणार !
औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर या मार्गावरून जातांना आणि येताना एस टी बसने मार्गक्रमण करावे ____ श्रीकांत सुरवसे ( डेपो मॅनेजर , भूम )
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १३ मे २०२५ :
तब्बल तीन वर्षांच्या त्रासानंतर पुन्हा धावणार औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर मार्गावर बस. प्रवाशांची सोय लक्षात घेता एस टी बस पुणे शहरात आल्यानंतर पिंपरी चिंचवडकडे जातांना औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर याच मार्गावरून मार्गक्रमित करण्याच्या सूचना कंडक्टर आणि ड्रायव्हरला देतो आणि दिनांक १४ मे २०२५ पासून पुणे पिंपरी चिंचवड शहरात जाणारी भूम डेपोची प्रत्येक एस टी बस औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर याच मार्गावरून जातील असे आश्वासन भूम डेपोचे मॅनेजर श्रीकांत सुरवसे यांनी सांगावा न्यूज प्रतिनिधीला दिले. धाराशिवाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगावा न्यूजच्या बातमीची दखल घेऊन धाराशिव जिल्ह्याचे एस टी मुख्य अधिकारी यांच्याशी बोलून प्रवाशांच्या सोईकरीता प्रवाशांच्या मागणी नुसार पूर्वीप्रमाणे याच मार्गावर बस चालवण्याच्या सूचना दिल्या. तसेच खासदार साहेबांनी तसे लेखी पत्र भूम एस टी डेपो कार्यालयाला देखील दिले होते. याकामी शिवसेनेचे भगवान बांगर यांनी पाठपुरावा करून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सहकार्याने भूम - पुणे, पिंपरी चिंचवड ही एस टी बस मूळ मार्गावरून येत्या १४ तारखेपासून जातांना आणि येताना सुरू होत आहे. पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्ष व सांगावा न्यूज चे संपादक विनय सोनवणे यांनी वेळोवेळी बातम्या देऊन प्रवाशांच्या सोयीसाठी या मुद्द्याला वाचा फोडली होती.
भूम - परांडा - वाशी तालुक्यातील लोकांचे वास्तव्य हे पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील सांगावी, थेरगाव, काळेवाडी, पुनावळे , रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, अजिंठानगर, निगडी या भागात आणि पिंपरी चिंचवड शहराच्या आसपास भूम परांडा वाशी तालुक्यातील लोकांची दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे भूम आणि परांडा डेपोच्या एस टी बस सांगावी काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर या मार्गावरून सुरू केल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची सोय होत होती. परंतु गेली तीन वर्षापासून मेट्रो आणि ट्रॅफिक चे कारण सांगून बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी शॉर्ट कट मारायला सुरुवात केली आणि वाकडेवाडी वरून थेट वल्हभनगर कडे बस घेऊन जाऊ लागले. वाकडेवाडी वरून पुढे दापोडी फुगेवाडी ते वल्हभनगर या मार्गावर उतरणारे प्रवासी नसतात तरीही कामचुकारपना करून ड्रायव्हर आणि कंडक्टर शॉर्ट कट मारतात. योग्य मार्गावर प्रवाशांना न सोडल्यामुळे इच्छित स्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांना केवळ तीन ते पाच किलोमीटर साठी तीनशे ते चारशे रुपये पुन्हा रिक्षासाठी द्यावे लागतात, त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होते. गेली तीन वर्षांपासून प्रवाशांना असा हा त्रास सहन करावा लागत होता. पिंपरी चिंचवड कडून भूम कडे जातांना मात्र अजिंठानगर - चिंचवड - डांगे चौक - काळेवाडी फाटा सांगावी फाटा - औंध मार्गे बस जाते. कारण याच मार्गावरून बस मध्ये गावी जाण्यासाठी प्रवासी असतात. पण पुन्हा गावावरून पिंपरी चिंचवड कडे येताना मात्र या मार्गावर प्रवाशांना न सोडता शॉर्ट कट मारून दापोडी वरून थेट वल्हभनगरला बस घेऊन जात होते, जिकडे उतरणारा प्रवासी नसतो. हा असा त्रास गेली तीन वर्षापासून प्रवासी सहन करीत होते. ट्रॅफिक किंवा नो एंट्रीची खोटी करणे एस टी डेपो अधिकारी यांना कंडक्टर आणि ड्रायव्हरने सांगून गेली तीन वर्ष प्रवाशांची पिळवणूक केली गेली. गावी जातांना तुम्हाला तो मार्ग चालतो मग पिंपरी चिंचवड कडे येताना असे प्रवाशांना वाऱ्यावर सोडून शॉर्ट कट का मारला जात होता असा प्रश्न आतापर्यंत अधिकाऱ्यांनी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना केला पाहिजे होता. शिवाय याच मार्गावरून गावाकडून पुण्याकडे पिंपरी चिंचवड कडे येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या लक्झरी बस ये जा करतात , तसेच पीएमपीएमएल या सिटी बस देखील पूर्ण क्षमतेने याच मार्गावरून ये जा करतात मग भूम आणि परांडा आगाराच्या एस टी बस कंडक्टर आणि ड्रायव्हरला काय प्रॉब्लेम होत होता हा थेट सवाल प्रवासी करीत आहे. गेली तीन वर्षात प्रवाशांची अशी हेळसांड करणाऱ्या कामचुकार एस टी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी देखील प्रवाशांची मागणी आहे.
सांगावा न्यूज चा इम्पॅक्ट व खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांच्या लेखी सुचणे नुसार आणि भगवान बांगर यांच्या पाठपुराव्याने पुन्हा भूम डेपोच्या एस टी बस पूर्वीप्रमाणे पुणे शहरात आल्यानंतर औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर याच मार्गावरून ये जा करतील असे आश्वासन भूम आगाराचे डेपो मॅनेजर श्रीकांत सूर्यवशी यांनी दिले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दिनांक १४ तारखेला काळेवाडी फाटा येथे एस टी बस आल्यानंतर काही प्रवासी मिळून बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांचे पुष्प हार घालून स्वागत करणार असल्याच्या भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या.
"भूम येथून पुणे पिंपरी चिंचवड कडे जाणाऱ्या बस या योग्य मार्गाने न जाता प्रवाशांना वाऱ्यावर सोडून शॉर्ट कट मारून वल्हभनगर डेपोत मुक्कामासाठी जातात, यासंदर्भात सांगावा न्यूज वरील बातमी पहिली. प्रवाशांचे असे हाल करणे चुकीचे आहे. त्यामुळे लगेच लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निदर्शनास मी आणून दिले. खासदार साहेबांनी एस टी चे जिल्हा स्तरावरील अधिकारी यांना सांगून प्रवाशांच्या सोयीनुसार योग्य त्या मार्गाने बस मार्गक्रमित करण्याच्या सूचना दिल्या. भूम डेपोला लेखी पत्र लिहून पाठविले. खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पाठपुरावा केला आणि आज बातमी समजते की दिनांक १४ मे पासून शॉर्ट कट बंद होऊन पूर्वीप्रमाणे प्रवाशांच्या योग्य मार्गावर भूम - पुणे, पिंपरी चिंचवड एस टी बस औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर अशी सुरू होत आहे याचा आनंद आहे"
____ भगवान बांगर ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : धाराशिव, भूम )
" गेली तीन वर्षांचा प्रवाशांचा वनवास संपत आहे. आणि पुन्हा योग्य त्या मार्गाने म्हणजेच औंध - काळेवाडी फाटा डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर या मार्गावरून बस मार्गक्रमित होत आहेत, असे आश्वासन भूम आगाराचे डेपो मॅनेजर श्रीकांत सूर्यवशी यांनी दिले. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल याचा आनंद आहे. यासाठी सांगावा न्यूज वर मी स्वतः बातम्या सातत्याने लावून धरल्या होत्या. सांगावा वरील बातमीची दाखल घेऊन धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ॲक्शन घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा करून शिवसेनेचे भगवान बांगर यांनी मुद्दा लावून धरला. याचा परिणाम म्हणून भूम - वाशी - परांडा या तिन्ही तालुक्यातील प्रवाशांच्या सोईसाठी पुन्हा एस टी बस योग्य त्या मार्गाने चालणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून भूम डेपो मॅनेजर यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करतो"
____ विनय सोनवणे ( अध्यक्ष : डिजिटल मीडिया परिषद, पिंपरी चिंचवड / संपादक : सांगावा न्यूज )
" चालक वाहक कर्मचारी सांगायचे की खूप ट्रॅफिक आहे, नो एन्ट्री असते, पावत्या फडव्या लागतात. परंतु मला स्वतः ला प्रवाशांनी मोबाईलवर संपर्क करून सांगितले की असे काही नाही. नॉर्मली ट्रॅफिक तर शहरात असतेच शिवाय इतर खाजगी ट्रॅव्हल बस आणि सिटी बस देखील याच मार्गावरून जातात तेव्हा एस टी बसला काय प्रॉब्लेम आहे ? तसेच भूम कडे येतांना प्रवासी योग्य त्याच मार्गाने प्रवासी भरून घेऊन येता मग जातात त्याच योग्य त्या मार्गावर प्रवासी का सोडत नाहीत ? हा प्रश्न प्रवासी करीत असल्यामुळे मला खात्री पटली की एस टी बस प्रवाशांच्या मागणी नुसार पूर्वीप्रमाणे मार्गक्रमण करायला काही हरकत नाही. आता प्रवाशांची सोय व्हावी म्हणून पूर्ववत मार्गावरून म्हणजेच भूम वरून पुणे शहरात एस टी बस पोहचल्या नंतर औंध - काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर या मार्गावरून बस चालवण्याच्या सूचना ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना देतो. फलक लावून तशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना देतो आणि येत्या १४ मे २०२५ पासून प्रवाशांच्या मागणीनुसार औंध - काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर या मार्गावरून भूम डेपोच्या एस टी बस जातांना आणि येताना मार्गक्रमण करतील "
___ श्रीकांत सुरवसे ( डेपो मॅनेजर, भूम )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा