| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ८ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावच्या मा. नगरसेविका व शिक्षण विभाग सभापती सौ. मनिषाताई प्रमोद पवार यांचा वाढदिवस दिनांक ६ जून रोजी संपन्न झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी थेरगाव परिसरातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श माता पितांचा सन्मान देखील करण्यात आला. आमदार शंकर जगताप यांनी मनिषाताई पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन उपस्थित नागरिकांचे आभार मानले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील आणि थेरगावातील राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिक मनिषाताई पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड संख्येमध्ये उपस्थित होते. मा. नगरसेवक अभिषेक बारणे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, भाजप नेते काळुरामशेठ बारणे, भाजप मंडल अध्यक्ष सनी बारणे, महिला आघाडी अध्यक्षा करिश्मा बारणे, सोनाली गाडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्या दरम्यान पत्रकार सागर सूर्यवंशी, पत्रकार रामकुमार शेडगे आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषद अध्यक्ष विनय सोनवणे यांनी उपस्थित राहून मनिषाताई पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा