शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून श्री सचिन भाऊ भिसे आणि सौ शितल सचिन भिसे यांचा वाढदिवस साजरा
| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक ७ जून : छावा मराठा सेनेचे प्रदेश महासचिव श्री सचिन भाऊ भिसे यांचा वाढदिवस दिनांक ५ जून रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला. सोबतच सौ शितल सचिन भिसे यांचाही वाढदिवस दिनांक याच दिवशी संयुक्तिकरित्या साजरा करण्यात आला. खाद्य पदार्थांच्या पार्ट्या देवून वाढदिवस साजरे करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चालू असताना आणि अनावश्यक दिखावा करून पैशाची उधळपट्टी करण्यात बर्थडे साजरे होत असताना आपण असे न करता समाजोपयोगी काहीतरी करावे असे ठरवून अनाथ आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले पाहिजे हा विचार करुन त्याची अंमलबजावणी केली. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करून श्री सचिन भिसे व शितल भिसे यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. शिवशक्ती फाउंडेशन संचलित स्पंदन बालक आश्रमात याठिकाणी वह्या पुस्तके व खाऊ वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित छावा मराठा सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विलास भाऊ पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष संगीता ताई नायकरे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सौ शितल ताई भिसे पाटील, छावा मराठा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ धस, छावा मराठा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीता ताई कड पाटील, ज्योतीताई पडवळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सो अश्विनीताई भोसले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ज्योतीताई खंडागळे, रंजनाताई चने, वैशालीताई ढोरे , स्वाती दाखले, चारुशीला ताई गिर, मथुराताई काटे , छावा मराठा सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत निकाळजे, अमोल भाऊ बंडगर, टेमगिरे मामा, छावा मराठा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत जी घुले, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्री शरद नाना कुंभार आणि पुणे जिल्हा संघटक मुरलीधर पांचाळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा