| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक , ८ : ठराविक उद्योजकांच्या आग्रहाखातील देशातील करोडो कामगारांच्या हिताचे कायदे रद्द झाल्यास श्रीमंत व गरीब यामधील दरी भविष्यात वाढणार आहे ! असे मत कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त करीत पुढील महत्वाचे मुद्दे मांडले.
२४० दिवस सलग सेवा केल्यानंतर नोकरीमध्ये कायम करण्याचे कायदे हे त्या परिवाराच्या संरक्षणाची देशाने घेतलेली हमी होती.
देशाच्या विकासाबरोबर देशातील प्रत्येक श्रमिकाचा विकास होणे म्हणजेच देशाचा विकास होणे असे सूत्र आहे.
कायम कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी, हंगामी, मानधनावर कामगार कामावर लावणे म्हणजे त्याचे आर्थिक व शारीरिक शोषण करण्यासारखे असून तो मानवतेवर अन्याय ठरत आहे.
या सूत्रामुळे ठेकेदार व भांडवलदार हा वर्ग श्रीमंत होणार व श्रमिक व कष्टकरी हा गरिबीच्या खाईत आपले जीवन कंठीत राहणार आहे.
नवीन धोरणानुसार श्रमिकांना त्याचे संरक्षण मिळणे कठीण होणार आहे,
त्यामुळे बँका त्याला लोन देणार नाहीत, स्वतःचे घर स्वतःची गाडी तसेच त्याच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळणे अवघड होऊन बसणार आहे त्यामुळे शिक्षणामुळे प्रगतीपथावर जाणारा देश मागे राहील अशी ही भीती भविष्यात राहणार आहे.
नवीन कायद्यानुसार हायर अँड फायर हे धोरण राहिल्यास श्रमिकांचे जीवन आर्थिक दृष्ट्या अशाश्वत राहणार आहे.
येणाऱ्या काळात या कायद्यांमुळे आस्थापनाने मान्यता दिल्यासच संघटना करण्याचा अधिकार या कामगारास राहील, व कोणतीही आस्थापना कामगार संघटनेस मान्यता देणार नाही त्यामुळे भविष्यात कामगार संघटन देखील संपुष्टात येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा संघटित मिल कामगार व विविध उद्योगातील कामगारांचा होता.
आठ तासाची नोकरी, विकली ऑफ, किरकोळ, अर्जित, आजारी रजा या त्याच्या कष्टाला उसंत देणाऱ्या होत्या त्यामुळे तो ताजा तवा नाहून पुन्हा जोमाने कष्ट करण्यास व देशाची प्रगती करण्यास सरसावत असे, भविष्यात याबाबतच्या सवलती न राहिल्यास मानवतेला देखील का पोहोचणार आहे, कष्टकऱ्यांमध्ये शारीरिक दुर्बलता वाढेल व आजारपण देखील वाढणार आहे.
देशाच्या प्रगती बरोबर देशाची प्रगती करणाऱ्या श्रमिकांच्या संरक्षणासाठी अधिक उत्तम कायदे होण्याची गरज आहे त्यावर भर दिल्यास खऱ्या अर्थाने देश प्रगल्भ झाला असे मानता येईल. असे सविस्तर विचार मांडून कष्टकरी कामगारांचे हित साधण्यासाठी यशवंत भोसेल व्यक्त झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा