Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ९ जुलै, २०२५

लाड-पागे समिती व अनुंकपा धोरणानुसार ४० वारसांना महापालिकेत मिळाली नोकरी

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ४० जणांना नियुक्ती पत्रे प्रदान

| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक ९ जुलै : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा वारस नियुक्ती नुसार ४० जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत,महानगरपालिकामधील सफाई आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखाद्या सफाई किंवा ड वर्गातील कर्मचाऱ्यांने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास, वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्याच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १, लिपिक ७, शिपाई ९ , मजूर ४ , गटरकुली १ आणि सफाई कामगार म्हणून १८ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच अनुकंपा धोरणानुसार लिपिक पदावर ५ जणांना, शिपाई पदावर ५ जणांना व सफाई कामगार म्हणून ४ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, असे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा