| सांगावा न्यूज | पोलादपूर, दिनांक २७ :
पोलादपूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग कुडपण या ठिकाणी शिक्षक दीड ते दोन वर्षे पिपळवाडी या शाळेतील शिक्षक शाळेवर आदेशीत केले आहेत. दुसऱ्या एका शिक्षकांना कुडपण येथे आदेशीत केल्यानंतर ते मेडिकल सुट्टी वर गेले आहेत. परंतु हे शिक्षक तालुक्यातील अनेक कार्यक्रम समारंभ उसत्व या ठिकाणी आनंद घेत आहेत असा ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला आहे. त्यांना निलंबित करा किंवा आम्हाला दुसरा शिक्षक द्या. असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दिला आहे. अशा या शिक्षकामुळे शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांना त्रास होत आहे. गटशिक्षणाधिकारी अधिकारी न भेटणे आणि टोलवाटोलवी उत्तरे देने यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे या शाळेत दिल्यास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ २७ नोव्हेंबर पासुन उपोषण करणार आहेत, असे निवेदन शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश चिकने यांनी तहसीलदार कपिलजी घोरपडे सर व पोलीस अधिकारी आनंद रावडे सर यांना दिले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य व अध्यक्ष मंगेश चिकने आणि ग्रामस्थांनी उपस्थित होते.
सध्य:परिस्थितीत पाहता कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नाही. विद्यार्थ्यांना थोडीफार दिलासा म्हणून कुडपण गावचे माझी सरपंच मंगेश चिकने यांनी स्वतःच्या खर्चातून शैक्षणिक साहित्य दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा