खेळाडू आणि नागरिकांसाठी सौ. रेखाताई नरेंद्र माने यांच्यातर्फे बापूजीबुवा उद्यानात बॅटमिंटन कोर्ट उपलब्ध
| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ३० : सामाजिक कार्यकर्त्या आज आधार को.ऑफ. सोसायटीच्या अध्यक्षा सौ. रेखाताई माने यांनी नागरिकांची, खेळाडूंची आणि लहान मुलांची गरज लक्षात घेऊन, थेरगावचे ग्रामदैवत बापूजीबुवा मंदिर परिसर उद्यानात बॅटमिंटन कोर्ट उपलब्ध करून दिला आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता येथील बापूजीबुवा उद्यानात बॅटमिंटन कोर्टचा उद्घाटन सोहळा सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे तसेच थेरगावचे ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी तानाजी बारणे यांच्यासह संदीप गाडे ) स्वीकृत नगरसेवक ), गोपाळ मळेकर स्वीकृत नगरसेवक ), अनंत घोगरे, सुरेश जगताप , दत्ताभाऊ कसले, मिलिंद शितोळे, दिलीप शिंदे, नाना मुठा , संजय गायके, किरण राजे, अशोक शर्मा, बाळासाहेब पाटील, प्रकाश शिरगिरे, आकाश पाटील, भरत महानवर, संजय भोसले, एडवोकेट व्यंकटेश यांच्यासह इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
काळुराम बारणे ( नेते भाजप ) , अभिषेक बारणे ( मा. नगरसेवक ) बापूजीबुवा गार्डनचे अध्यक्ष महेश बारणे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बॅटमिंटन कोर्ट चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बॅडमिंटन कोर्ट उद्घाटन प्रसंगी बोलतांना नरेंद्र माने म्हणाले," मी दररोज गार्डन मध्ये पाहतो की, लहान लहान मुले, नागरिक हे इथे बॅडमिंटन खेळताना दिसायचे मग ते जॉगिंग ट्रॅकवर तर कधी गार्डनमध्ये इतरत्र दिशाहीन खेळत होते. व्यवस्थित जागा आणि प्रोफेशनल नेट बॅट आणि इतर फ्रोडेशनल साहित्य उपलब्ध नव्हते. तेव्हा त्यांची गरज लक्षात घेऊन ठरवले की इथे बॅडमिंटन कोर्ट ची आवश्यकयता आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही ठरवले आणि रेखा माने यांनी सकारात्मकता दाखवून अंमलबजावणी केली आणि आज थेरगाव येथे बॅडमिंटन कोर्ट तयार करता आले. यामुळे खेळाडू आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नियमाने खेळतील बारकावे जपून येथे नागरिक खेळत राहतील त्यातून एखादा चॅम्पियन घडू शकतो. हाइवे आरोग्याच्या दृष्टीने खेळ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या बॅडमिंटन कोर्ट उद्घाटन प्रसंगी "बापूजीबुवा हेल्थ क्लब" स्थापन करून नागरिक आणि क्रीडा प्रेमींचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रयत्नशील राहील" असे मत संजय गांधी निराधार योजनेचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र माने यांनी यावेळी सांगितले.
" यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजीभाऊ बारणे आपल्या मनोगतता म्हणाले की, खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसांपासून इथे बॅटमिंटन कोर्ट ची मागणी क्रीडा प्रेमींकडून होत होती. त्या गरजेची पूर्तता करून इथे बॅटमिंटन कोर्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ. रेखाताई नरेंद्र माने यांचे थेरगावकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आता सामान्य नागरिक क्रीडा प्रेमी आणि लहान लहान मुलं मुली येथे बॅटमिंटन खेळाचा आनंद घेऊ शकतात. असे मनोगत तानाजी बारणे यांनी व्यक्त केले.
बॅडमिंटन कोर्टचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्याबरोबर एक खुल्या गटात मॅच घेण्यात आली यामध्ये विजेत्या खेळाडू जोडीला रोख रक्कम बक्षीस देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
आजपासून थेरगाव परिसरातील सर्व बॅडमिंटन प्रेमी, खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिकांना
नवीन बॅडमिंटन कोर्टचा लाभ घेता येणार आहे याचे समाधान वाटत असल्याचे मत सौ. रेखाताई नरेंद्र माने यांनी व्यक्त केले.
विविध सामाजिक उपक्रम थेरगाव मध्ये राबवत रेखाताई माने या प्रभाग क्रमांक २३ मध्ये प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. याच महिन्यात त्यांनी २६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या दिवशी भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा घेऊन "रन फॉर संविधान" च्या माध्यमातून संविधान जागृती करीत नागरिकांशी सुसंवाद साधला. संविधान दिनाच्या कार्यक्रमा वेळी आमदारांची हजेरी आणि आमदार शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरण कार्यक्रम झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या लक्षात राहील असा हा रन फॉर संविधान कार्यक्रम प्रभावीपणे यशस्वी केला होता. आणि आज ग्रामदैवत श्री बापूजीबुवा मंदिर गार्डन परिसरात बॅटमिंटन कोर्ट साठी लागणारे क्रीडा साहित्या देऊन बॅटमिंटन कोर्ट चे उद्घाटन केले.
दरम्यान ग्रामदैवत श्री बापूजीबुवा मंदिरात आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाहून पूजा करण्यात आली.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा