युवा पर्वाचा नवा शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात घडवणार इतिहास
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संभाव्य उमेदवार
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून , प्रभाग आरक्षण सोडत गेल्या काही दिवसात पूर्ण झाली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जाती जमाती पुरुष (अ ) मधून पत्रकार सागर गोपाळ सूर्यवंशी हे भारतीय जनता पार्टी पक्षाच्यावतीने इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
सागर सूर्यवंशी यांच्या माध्यमातून शहरात आणि प्रभागातील सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, त्यांना येणाऱ्या अडी अडचणी दूर करणे ,प्रभागातील तरुण बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणे, महापुरुषांच्या जयंती साजरा करणे, शहरातील व प्रभागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सुविधासाठी आरोग्य शिबिराच्या आयोजन, रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून अन्नदान वाटप, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करणे अशा अनेक प्रकारचे सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सागर सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक कार्य केले आहेत.या मधून त्यांनी शहरातील पत्रकारावर होणारा अन्याय,हल्ले , दादागिरी ,गुंडशाही प्रकारच्या लोकांना आपल्या माध्यमाच्या मदतीने त्यांनी पत्रकारांना सहकार्य करून त्याच्या सोबत काम केले आहे.
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या माध्यमातून त्यांनी मोठी ताकद निर्माण केली असून ते पक्षाच्या नेतृत्वाखाली सामाजिक ,राजकीय कार्य मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहे. शहरातील कामगाराचे असलेले प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अनेक प्रकारचे आंदोलन, उपोषणे केले आहे. त्यांच्या मागे शहरातील कामगार कार्यकर्ते व कामगार बांधव मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे आहेत अशी चर्चा सध्या सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 खराळवाडी , नेहरू नगर ,अजमेरा या प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याने त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे दिसून आले. प्रभागातील सर्व सामान्य नागरिक, युवा वर्ग , जेष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, व्यावसायिक यांच्या येणाऱ्या अडी अडचणी लक्षात घेऊन त्यांनी वेळोवेळी मार्गी लावली आहे. त्यांच्या या कार्याचे दखल घेऊन प्रभागातील व परिसरातील नागरिकांनी व युवा तरुणांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. नागरिकाच्या माध्यमातून व सामाजिक कार्यातून सागर सूर्यवंशी यांनी ही निवडणूक भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडणूक लढवावी त्यांना आम्ही आमच्या मताधिक्याने विजयी करणार, आम्हाला आमच्या हक्काचा माणूस मिळाला, आमचे नेतृत्व करणारा युवा, प्रेमळ, शांत, अभ्यासू, व्यक्तिमत्व असलेले , युवकांचे आधारस्तंभ असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
नागरिकांच्या वतीने येणाऱ्या या मोठ्या संख्येने असलेल्या प्रतिसादाला उत्तर देत पत्रकार सागर सूर्यवंशी ही निवडणूक लढवणार असल्याचे सध्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा