Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ


|सांगावा | पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२५ : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्र निहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना दिलेल्या सुचनेनूसार दुबार मतदार व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबर २०२५ तारीख निश्चित केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा