Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

अलमगीर मशीद, वाकड येथे मुस्लिम बांधवांकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


५१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; मानवतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

| सांगावा न्यूज | वाकड | दिनांक १७ जुलै २०२६ : समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत "रक्तदान हेच श्रेष्ठदान" या भावनेतून वाकड येथील अलमगीर मशीद परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मुस्लिम बांधवांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजात मानवतेचा आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत, अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेले रुग्ण तसेच विविध वैद्यकीय उपचारांसाठी रक्ताची गरज असलेल्या नागरिकांसाठी रक्तदान हे खऱ्या अर्थाने जीवनदान असल्याचे सांगितले. शिबिरामध्ये विविध सामाजिक स्तरातील युवक, नागरिक आणि मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदानासाठी आलेल्या प्रत्येक रक्तदात्याची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले. रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाविषयी जनजागृती होण्यास मदत झाली असून, नियमित रक्तदानाची सवय लागावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. भविष्यातही अशाच समाजोपयोगी आणि लोकहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस रक्तपेढी, भोसरी यांनी तांत्रिक सहकार्य केले. यावेळी रेड प्लस रक्तपेढीचे डॉ. इंदल जैस्वाल, ट्रस्टी हसनभाई शेख, फकीरभाई शेख, शाहिद शेख, जाकीर शेख, युसूफ शेख तसेच परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव, सहकार्याची भावना आणि मानवतेची जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा