| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २१ जुलै २०२६ : फोर्स फ्रेंड्स ग्रुपच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि वारकऱ्यांसाठी अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष संतोष (दादा) कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना संतोष कांबळे म्हणाले, समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून फोर्स फ्रेंड्स ग्रुप गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. रक्तदान शिबिरांमधून आतापर्यंत १,८०० हून अधिक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आणि करमाळा परिसरात १० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून, भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजू पेठे, आदर्श शिक्षक आण्णा हेळकर, विशाल परदेशी, उद्योजक बाळासाहेब कांबळे आणि माजी सरपंच हनुमंत ढावरे प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या फोर्स फ्रेंड्स ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा 'उद्योजक पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. सतीश शिंगारे, इरफान सय्यद, श्रीनिवास हजारे, नारा गोपी, निलेश शिंदे आणि गणेश हजारे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास स्वप्निल भोसले, बापू गोरे, सोनू गायकवाड, पै. अमोल गायकवाड, बिरजू भोसले, अविनाश जाधव, दयानंद एडके, गणेश शिंदे, बाळासाहेब सांगळे, दीपक अडसूळ, बादल गस्ते, नितीन रोकडे, अंकुश बोटे, योगेश मथुरिया, निलेश येळवंडे, सुनील खडसे, हसन शेख, हुसेन मनियार, मनोज दोडके, चंद्रप्रकाश यांच्यासह फोर्स फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा