Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करून वंचित इतर मागासवर्गीय घटकांना शासनाने लाभ द्यावा __अशोक नारायण मगर


महाराष्ट्र नाभिक महामंडळ आंबेगाव तालुका अध्यक्षपदी श्री सुनील आनंदा शिंदे यांची निवड

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २४ : महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. कल्याणराव दळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नाभिक महामंडळ आंबेगाव तालुका अध्यक्षपदी श्री सुनील आनंदा शिंदे यांची निवड करण्यात आली. दिनांक २३ जून रोजी आंबेगाव येथे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील शिंदे यांचा महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक नारायण मगर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. 

यावेळी अशोक मगर म्हणाले की "इतर मागासवर्गीय वंचित घटकांना न्याय देण्यासाठी शासनाने रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करावी. तसेच खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेऊन शासनाच्या विविध शैक्षणिक सवलतीचा लाभ घेऊन आपली शैक्षणिक पात्रता वाढवावी. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे. नागापूर गावात उपसरपंच, सरपंच अशा विविध पदावर काम केल्याचा अनुभव आहे. यांच्या अनुभवाचा फायदा समाजहिताच्या दृष्टीने शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर नक्की होईल"

दरम्यान कार्यक्रम संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थितांचे स्वागत मा.अध्यक्ष आंबेगाव तालुका सचिन देवडे यांनी केले. पुणे जिल्हा मा.महिला अध्यक्ष अनिता मगर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे, पुणे जिल्हा संघटक संतोष गोरे, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा रुपाली गोरे महिला कोषाध्यक्ष पिंपरी चिंचवड वनिता कारेकर , खेड तालुका म. अध्यक्षा कविता वाळुंज व आंबेगाव तालुका कार्यकारिणी सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा सरचिटणीस तेजस पंडित यांनी केले. आभार नितीन शिंदे यांनी मानले. 
                
                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा