Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २१ जुलै, २०२६

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई; अन्यायाविरोधात आंदोलन छेडण्याचा पथ विक्रेता समिती सदस्यांचा इशारा!


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड , दिनांक २१ जुलै२०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या पथ विक्रेत्यांवर (फेरीवाल्यांवर) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून नाहक आणि कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे हजारो कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याप्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मार्ग काढावा, अन्यथा कुटुंबासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 'पिंपरी-चिंचवड पथविक्रेता समिती'चे लोकनियुक्त सदस्य श्री किसन उर्फ माऊली भोसले यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना आज निवेदन सादर केले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे

* कारवाईवर तत्काळ थांबवावी 
शहरात फेरीवाल्यांवर सुरू असलेली प्रशासकीय दंडात्मक आणि जप्तीची कारवाई त्वरित थांबवण्यात यावी.

 * ओळखपत्र व परवाने वाटप करण्यात यावे:
महापालिकेने बायोमेट्रिक सर्वेक्षण केले असले तरी हजारो पात्र विक्रेत्यांना अद्याप ओळखपत्र किंवा विक्री प्रमाणपत्र (License) मिळालेले नाही, ते त्वरित देण्यात यावे.

* टाउन वेंडिंग कमिटी'ची स्थापना:
 पथविक्रेत्या समितीची निवडणूक होऊन दोन वर्षे उलटली तरी समिती गठित झालेली नाही. त्यामुळे 'टाउन वेंडिंग कमिटी' (TVC) ची नियमित बैठक घेऊन हॉकर्स आणि नो-हॉकर्स झोन निश्चित केले जावेत.

* पुनर्वसनापर्यंत व्यवसाय करू द्यावा:
जोपर्यंत अधिकृत हॉकर्स झोनमध्ये पूर्ण सोयी-सुविधांसह पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत सध्याच्या जागेवर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी.

* गैरकायदेशीर आठवडे बाजार बंद करा:
 शहरात विविध ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आठवडे बाजार सुरू असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होते व हप्त्यातून एकदा नियमांचे उल्लंघन करून कारवाया केल्या जातात.

यावेळी सुधाकरजी इंगळे, अनील गुप्ता, अंकुश भोसले, सिमरन दीदी, मनीष गुप्ता , विनय सोनवणे, यांच्या सह असंख्य पथविक्रेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. जर महापालिका प्रशासनाने या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अन्यायाकारक कारवाई थांबवली नाही, तर पथविक्रेत्यांना आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

"आम्ही कायद्याचा आदर करतो आणि शहराच्या वाहतुकीला किंवा सौंदर्याला बाधा आणू इच्छित नाही, परंतु आमच्या पोटापाण्याचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे."
 ___श्री किसन उर्फ माऊली भोसले (सदस्य, पिंपरी-चिंचवड पथविक्रेता समिती)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा