Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २१ जुलै, २०२६

वाकड रोड डांगे चौक येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २१ जुलै २०२६ : वाकड रोडवरील डांगे चौक येथे गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून,या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की वाकड थेरगाव परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनसंख्या यामुळे डांगे चौकातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत आहे. वाकड रोड डांगे चौक येथे सध्या कोणतीही प्रभावी व कायमस्वरूपी वाहतूक सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे सर्व दिशांमधून येणारी वाहने एकाच वेळी चौकात प्रवेश करतात. त्यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. या चौकातून पीएमपीएमएल बस, रुग्णवाहिका,दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नाही, कर्मचारी कार्यालयात उशिरा पोहोचतात तसेच स्थानिक व्यावसायिकांनाही याचा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडने डांगे चौकात आधुनिक व समन्वयित वाहतूक सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे,गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे उपाध्यक्ष गणेश देवराम यांच्या स्वाक्षरीने वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना सादर करण्यात आले असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा