Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, १३ जुलै, २०२६

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध!


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि.१३ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आज  महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. 

महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदासाठी प्रत्येक प्रभागातून एकच उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाल्याने सर्व प्रभाग समिती सभापती पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (भा.प्र.से.) प्रजित नायर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

या निवडणूक प्रक्रियेचे नगरसचिव उल्हास जगताप, मुकेश कोळप,विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रभाग अधिकारी निवेदिता घार्गे,गोरक्षनाथ लिमण, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे, डी.डी.कांबळे,संतोष कोराड तसेच नगरसचिव विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले तर निवडणूक प्रक्रियेचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

पीठासीन अधिकारी प्रजित नायर यांनी आज जाहीर केलेल्या निर्णयानुसार, 'अ' राजगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना करांडे, 'ब' सिंहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी मंदार देशपांडे, 'क' विजयदुर्ग प्रभाग समितीच्या सभापतीपदी निखिल बोऱ्हाडे, 'ड' देवगिरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी सविता खुळे, तर 'इ' शिवनेरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना सस्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 'फ' तोरणा प्रभाग समितीच्या सभापतीपदी शिवानी नरळे, 'ग' पुरंदर प्रभाग समितीच्या सभापतीपदी मनिषा पवार, 'ह' प्रतापगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी तृप्ती कांबळे, 'ज' रायगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी आरती चोंधे आणि 'ल' लोहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी रेखा देवकर यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

प्रभाग सभापती पदाची निवडणूक पूर्ण संपल्यानंतर प्रभाग समिती सभापतींनी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य,नगरसदस्यांची भेट घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा