| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १४ जुलै २०२६ : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक नरवीर शिवा काशिद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथी (बलिदान दिन) निमित्त भोसरी येथील पीएमटी चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करून अभिवादन करण्यात आले. हा अभिवादन सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहराध्यक्ष श्री.सोमनाथ शिंदे यांनी प्रस्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मनोज विळसकर यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा सचिव श्री.नितीन कुटे आणि पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ. मंगलताई आढाव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक असलेल्या नरवीर शिवा काशिद यांच्या अद्वितीय शौर्याची गाथा थोडक्यात सांगून उपस्थितांना प्रेरित केले. याप्रसंगी बोलताना पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अशोक मगर म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवा काशिद यांच्या नावाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास कामास नाव दिल्याने नवीन पिढीला आपल्या देदिप्यमान इतिहासाची माहिती मिळेल आणि त्यांच्याकडून मोठी प्रेरणा लाभेल”. दरम्यान श्री. मनोज वेळसकर यांची पिंपरी चिंचवड शहर सचिव आणि अरविंद लोखंडे यांची पिंपरी चिंचवड शहर संघटक पदी आणि गणेश भोंडेकर यांची भोसरी विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या गौरव सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब यादव, संपत ताटे, मुरलीधर रायकर, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सुनील वाळुंज, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष पंकज व्यवहारे, भोसरी गावचे उद्योजक रवी गव्हाणे, पुणे जिल्हा संघटक गजानन वाशिमकर, अशोक पंडित, अनिल कारेकर, श्री संत सेना महाराज विश्वस्त रमेश गांगुर्डे, हरीभाऊ शेळके, व्यावसायिक बांधव राहुल जगताप, सतीश यादव, कुलदीप भिसे तसेच पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष सौ. मोहिनीताई ऊरकुटकर, पिंपरी चिंचवड शहर महिला कोषाध्यक्षा सौ. वनिताताई कारेकर, पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटक सारीका शिंदे, सौ. निकीता वेळसकर, सौ.राधिका भोंडेकर, सौ.सुनिता पंडित, सौ.शिल्पा शिंदे आदींसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पुणे जिल्हा सरचिटणीस तेजस पंडित यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा