प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षपूर्ती निमित्त स्टेप्स फाउंडेशन आयोजित बातम्या व छायाचित्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकशाहीचा चौथा स्तंभ नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यावर आधारित बातम्या छायाचित्रांचे प्रदर्शन संपन्न
| सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक ५ : "आपला आदर्श, आपली प्रेरणा, नवमहाराष्ट्र निर्माण संकल्पना" या विचारांवर आधारित सर्वस्पर्शी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याच्या , विद्यमान सरकार मधील वर्षपूर्ती निमित्त, "लोकशाहीचा चौथा स्तंभ" असलेल्या नामांकित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचे चित्र प्रदर्शन चिंचवड येथे दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाले. दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्रेक्षागृह आर्ट गॅलरी चिंचवड येथे पंकज भोयर ( मंत्री, महाराष्ट्र राज्य), यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, गजानन जोशी (मुख्य संयोजक: देवाभाऊ फांऊडेशन, महाराष्ट्र राज्य), विश्वजीत देशपांडे (प्रदेशाध्यक्ष: परशुराम हिंदू सेवा संघ, महाराष्ट्र) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कर्तृत्ववान मुख्यमंत्री, गतिमान शासन व निर्णय अंमलबजावणी झालेल्या या मुख्यमंत्र्यांच्या कार्याला उजाळा मिळावा हा कार्यक्रम घेण्यापाठीमागे निष्पक्ष हेतू आहे असे मुख्य आयोजक नितीन चिलवंत यांनी सांगून सुरूवातीला मंत्री महोदयांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. निमंत्रक व स्टेप्स फाउंडेशन चे संदेश मुखेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुसज्ज नियोजन केले होते त्याचा दर्शक आणि मान्यवरांनी अनुभव घेतला.
यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, "प्रथमच पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशापद्दतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव प्रकाशित झालेल्या बातम्यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करून ते सर्वासाठी खुले केल्याबद्दल स्टेप्स फाउंडेशनचे आणि संपुर्ण टीमचे कौतुक. असे कार्यक्रम प्रत्येक जिह्यात झाले पाहिजेत जेणेकरून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांच्या कार्याला उजाळा मिळेल"
गोरक्ष लोखंडे (अनुसूचित जाती/जमाती आयोग सदस्य, सचिव दर्जा) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "या चित्र प्रदर्शनातील सर्वात जास्त आवडलेला फोटो म्हणजे, माझ्या राज्यातील गरीब आणि शेवटचे घर जोपर्यंत सुखी नाही ते राज्य सुखी नाही! असा विचार करून रयत सुखी ठेवण्यासाठी कार्य करणारे मराठी मनाचा मानबिंदू या मातीने आम्हाला दिला, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतानाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे चित्र जास्त भावले"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा