बालदिनानिमित्त थेरगावमध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा
| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ७ : बालदिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो, आपल्या थेरगावमध्ये
रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी बालदिना निमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक २३ मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रभाग अध्यक्षा सौ. सोनालीताई संदीप गाडे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. बापूजीबुवा गार्डन, थेरगाव गावठाण येथे सकाळी ८ वाजता भव्य चित्रकला स्पर्धा होणार असून स्पर्धा इयत्ता २ री ते ५ वी आणि इयत्ता ६ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये होणार आहे.
: चित्रकलेचे विषय पुढीलप्रमाणे :
* इयत्ता २ री ते ५ वी
१.माझा आवडता प्राणी
२.माझा आवडता पक्षी
३.फुगेवाला
* इयत्ता ६ वी ते १० वी
१.माझा आवडता उत्सव
२.ऑपरेशन सिन्दुर
३.सैनिकांना राखी बांधणारी बहीण
४.वृद्धाश्रमाला भेट
५.गणपती विसर्जन नंतरचा दुसरा दिवस
६.किल्ले बनवणारे बाल कलाकार.
चित्रकला स्पर्धेमध्ये पहिल्या तीन क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना विशेष बक्षिसे मिळणार आहेत तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहेत, ते पुढीलप्रमाणे
*प्रथम क्रमांक*
टॅब, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक
*द्वितीय क्रमांक
सायकल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक
*तृतीय क्रमांक
सायकल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक
विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि या चिमुकल्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रभाग क्रमांक २३ मधील विद्यार्थांसाठी खास आयोजित केलेल्या या स्पर्धेत पालकांना देखील आपल्या मुला मुलींनी रेखाटलेल्या कलाकृतींचा आनंद घेता येणार आहे.
प्रत्येक सहभागी स्पर्धकांनी येतांना सोबत पाण्याची बाटली, रंगकामाचे साहित्य, पेन्सिल, एरेझर, रायटिंग पॅड इत्यादी साहित्य सोबत घेऊन येणे आवश्यक.
सर्वांनी स्पर्धेसाठी वेळेवर हजर रहावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी सौ.सोनालीताई संदीप गाडे
यांच्या संपर्क कार्यालयाला भेट द्यावी.
पत्ता: पवार नगर, कॉलनी क्रमांक १, थेरगाव, पुणे-४११०३३.
संपर्क: ९९२१४७०१०१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा