हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगून प्राध्यापक जितेंद्र वडशिंगकर यांनी हुतात्म्यांच्या कार्याला दिला उजाळा
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ४ : हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी हुतात्मा भाई कोतवाल त्यांच्या कार्य–कर्तृत्वाची माहिती सांगितली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी समाजातील तरुणांना भाई कोतवाल यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची जिद्द, समाजहितासाठी केलेली निःस्वार्थ सेवा आणि नेतृत्वगुण आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, हा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.उपस्थित महिलांनी आपल्या मुलांना भाई कोतवाल यांचा आदर्श आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलमंत्र म्हणून अंगीकरावा असे प्रतिपादन केले.
स्वातंत्र्य चळवळीत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सामाजिक व राजकीय तसेच स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेले विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांचे माथेरान येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनावे असे मागणी अशोक मगर अध्यक्ष, पुणे जिल्हा, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी केली दि. १ डिसेंबर २०२५ रोजी स्वातंत्र्यसुर्य हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांची ११३ वी जयंती उत्सापूर्वक वातावरणात स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल चौक फुगेवाडी दापोडी येथे साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीमती संध्याताई गायकवाड माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रकाश तिर्लापूरकर, कुसुम तिर्लापुरकर, सौ भारती तिर्लापूरकर, सौ. सुषमा अवरादी, प्रशांत अवरादी आदी भाई कोतवाल यांचे नातेवाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात भाऊसाहेब यादव, रामचंद्र वाळुंजकर, अण्णा बोराडे, नितीन सुरवसे, वसंत ढवळे, संपत ताटे, गजानन वाशीमकर, अंकुश जाधव, सोमनाथ शिंदे, प्रा. विक्रमादित्य मालतुमकर, सुशिल रसाळ, मनोज वेळस्कर, तेजस पंडित, नितीन कुटे, अनिताताई वाळुंजकर, अनिताताई मगर (मा. महिला अध्यक्ष पुणे जिल्हा) शुभदा राऊत, सुजाता वाळुंजकर, पंकज व्यवहारे, विशाल वाळुंजकर, ॲड. सिद्धार्थ वाळुंजकर शांताराम क्षिरसागर यांच्यासह श्री. अशोक नारायण मगर
अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर यांनी केले. तर आभार श्री गणेश वाळुंजकर अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर यांनी मांनले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा कार्यकारणी यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा