| सांगावा न्यूज | पिंपळे सौदागर दिनांक ३ : भारतीय कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल नवी दिल्ली येथे " लाईफ टाईम अचिव्हमेंट " पुरस्काराने गौरविण्यात आलेले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा साई पर्ल सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने रविंद्र नंदनवार , अरविंद पाटील, निकेश कुमर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये बाजीराव अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. २ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनिल कुलकर्णी, तानाजी कांबळे, सुखदेव फुलेवाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत माने यांनी केले. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले. सत्काराला उत्तर देताना डॉ. विलास भाले म्हणाले की, कुठलेही कार्य करताना स्वतः ला झोकून द्या, सकारात्मक रहा, यश हमखास मिळते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा