Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पुर्ण

पुढील टप्प्यातील मतदान प्रशिक्षण महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय निहाय - उपायुक्त पंकज पाटील

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. २८ डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या मतदान प्रक्रिया प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे तीन सत्रांमध्ये पार पडला.
या प्रशिक्षणास उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य प्रशिक्षक सतीश मेहेर, रामेश्वर पवार, ईव्हीएम प्रशिक्षण देणारे आयटीआय अधिकारी यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी तसेच मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उप आयुक्त पंकज पाटील म्हणाले, निवडणूक ही लोकशाहीमधील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची भूमिका निर्णायक असते. प्रत्येक अधिकाऱ्याने मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अचूकपणे समजून घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल, मतदान साहित्य व्यवस्थापन, मतदार ओळख तपासणी, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच मतदानानंतरची कार्यवाही या सर्व बाबींबाबत सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता, पारदर्शकता आणि शिस्त राखणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे.
मतदान प्रक्रियेत कोणतीही शंका किंवा अडचण निर्माण झाल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियमानुसार कार्यवाही करावी. प्रत्येक मतदान केंद्रावर शांततापूर्ण वातावरणात, निर्भय व विश्वासार्ह मतदान होईल याची खात्री करणे हेच या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय निहाय मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना पुढील प्रशिक्षण देण्यात आहे. असेही उप आयुक्त पंकज पाटील यावेळी म्हणाले.
प्रशिक्षणात संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ईव्हीएम, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत, निवडणूकविषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, टपाली मतदानाची प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्रांची तपासणी आदी बाबींचा समावेश होता.
तसेच मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची रचना, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यानंतर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
याशिवाय मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये व जबाबदाऱ्या, तसेच मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परिसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा व महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ईव्हीएम, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट हाताळण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकदेखील यावेळी दाखविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा