Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

दैनिक महिला संवादचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड , दिनांक ३१ मार्च : दैनिक महिला संवादचा प्रथम वर्धापन दिन दिनांक २९ मार्च रोजी आरंभ बँक्वेट हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नगरसेविका अर्चना तापकीर, ॲड. स्नेहा कांबळे, कार्यकारी संपादक विद्या जाधव व उपसंपादक सुनंदा निक्रड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानेश भुकेले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कैलास थोपटे यांच्या हस्ते महिला संवाद न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास ॲड. वंदना गायकवाड, नगमा शेख, उमा बगाडे, माधुरी शहापूरे, किरण साळवे, दीपाली सौदागर,मनिषा असादे, दिपिका सावंत, रत्नमाला देवमाने, चंद्रकला चव्हाण, अनिता लोहार, दिशा कदम, सोनाली कांबळे, आशा मुळीक, श्री अप्पासाहेब माने, प्रा. संजीव सूर्यवंशी, भागचंद चव्हाण, नरेश असादे, महेश सोनटक्के,प्रशांत थोरात,संजय गायके तसेच संस्कार प्रतिष्ठानची टीम उपस्थित होती. ज्येष्ठ पत्रकार विकास साळवे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी, डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, महावीर जाधव, माऊली भोसले, रमेश साठे, संजीव सूर्यवंशी, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, नरेश जीवनाल

उपस्थित मान्यवरांनी दैनिक महिला संवादच्या कार्याचे कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा व्यासपीठांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी केले. प्रारंभी संपादक ज्योती आडेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेत पुढील ध्येयधोरण स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा