Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २६ मार्च, २०२६

जागतिक वन दिन व जागतिक जल दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

 

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २६ मार्च २०२६ : जागतिक वन दिवस आणि जागतिक जल दिनाचे औचित्य साधून, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील राजश्री शाहू गार्डन, चिंचवड,पुणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षणसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक वन दिन जगभरात साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश सर्व प्रकारच्या वनांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे असून, संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये या दिनाची घोषणा केली. हा दिवस हवामान बदल रोखण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी प्रेरित करतो. वने हे पृथ्वीचे "फुफ्फुस" मानले जातात, कारण ती कार्बन डायऑक्साइड शोषून हवा शुद्ध ठेवतात आणि जैवविविधतेला आधार देतात. तसेच २२ मार्च हा दिवस जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश पाण्याचे संवर्धन, संरक्षण आणि शाश्वत वापरासाठी लोकांमध्ये जागृती करणे. सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या महत्त्वाबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे. या दोन्ही दिनाचे औचित्य साधून,जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजश्री शाहू गार्डन,चिंचवड,पुणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षणसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शाहू गार्डन चे रक्षक गार्ड श्री.सलीम शेख,श्री.अजित सांगोलकर आणि अभिषेक गवळी यांना राष्ट्रीय वृक्ष मित्र पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन नरुटे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ.धनश्री नरुटे,महाराष्ट्र राज्य महिला निरीक्षक सौ.स्नेहा तांबे,महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सौरभ हजारे, तसेच संस्थेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा