Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ८ मार्च, २०२६

| सांगावा न्यूज | दिनांक ८ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील आज दिवसभरातील महत्वाच्या टॉप १० न्यूज

| सांगावा न्यूज | दिनांक ८ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील आज दिवसभरातील महत्वाच्या टॉप १० न्यूज 

-----------------

१. महापालिका शिक्षकांसाठी वैयक्तिक अनुकूल शिक्षण पद्धती या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि इएल माईंडस्पार्क तर्फे EdTech (शैक्षणिक तंत्रज्ञान) आणि PAL – Personalised Adaptive Learning (वैयक्तिक अनुकूल शिक्षण पद्धती) या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे संपन्न आले. 
-----------------

२. गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू

गंभीर आजार व शस्त्रक्रियांसाठी मिळणार आर्थिक मदत; महापौर कार्यालयामार्फत अर्ज करून मिळणार योजनेचा लाभ

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी या उद्देशाने 'महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना' सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर आजार, उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
-----------------

३. पिंपरी चिंचवड शहरातील प्रणाली पाटील हिने सी.ए. परीक्षा उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले

याबद्दल नगरसेविका श्रुती वाकडकर व राम वाकडकर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
-----------------

४.पवना नदीचे पावित्र्य धोक्यात; जनावरांची चरबी-चामडे थेट नदीपात्रात फेकण्याचा घृणास्पद प्रकार

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीचे पावित्र्य धोक्यात आणणारा धक्कादायक प्रकार पुनावळे परिसरात उघडकीस आला आहे. मोठ्या जनावरांची चरबी, चामडे तसेच मांसाचे गाठोडे थेट नदीपात्रात फेकले जात असल्याने नदी प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका अधिकारी व राम वाकडकर यांच्या सह सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
-----------------

५. अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर २०२६ पिंपरी चिंचवड शहरात संपन्न 

लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त, पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानात भव्य विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज या शिबिराचा समारोप झाला. या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास, महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या . तसेच विविध आजारांवर मोफत वैद्यकीय सल्ला व नागरिकांचे मार्गदर्शन करण्यात आले. 
-----------------

६. तळेगाव- चाकण उन्नत मार्गासाठी ६ हजार ४९९ कोटी तरतूद! 

मावळसह चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवून औद्योगिक विकासाला चालना देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय भाजपा महायुती सरकारने घेतला आहे. तळेगाव- चाकण २५ किलोमीटरच्या उन्नत मार्गासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
-----------------

७. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील श्रीमती गोदावरी महाविद्यालय येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन संपन्न

समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण, उद्योग, सामाजिक क्षेत्र आणि विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि सबलीकरण यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे विचार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.
-----------------

८. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जाज्वल्य विचारांचा आणि साहित्याचा वारसा अधिक सक्षमपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! 

'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती'चे पुनर्गठन करण्यात आले आहे. समितीमध्ये निवड झालेल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! अण्णाभाऊंच्या साहित्याचे संवर्धन आणि प्रकाशनाचे कार्य ही समिती प्रभावीपणे पार पाडेल. असे मत व्यक्त करून आमदार अमित गोरखे यांनी समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
-----------------

९. पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असलेली मिस इंडिया सायलीची घरवापसी

माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत, लग्नानंतर अतिझा असे नाव असलेली सायली म्हणाली की माझा छळ झाला, घरवापासी करीत असताना पिंपरीत यज्ञ, मंत्रोच्चारात शुद्धीकरण कार्यक्रम संपन्न
-----------------

१०. हिंजवडी परिसरात, जास्त परताव्याचे अमीष दाखवुन ४ कोटी १६ लाख २० हजार रुपयांची फसवणूक 

सबंधित प्रकरणात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शेअर मार्केट तसेच भिशी मध्ये गुंतवण्यास भाग पाडुन फिर्यादीचे ५७,०६,००० रु आणि इतर गुंतवणुकदारांकडुन ३,५९,१४,८९२ रु असे एकुण ४ कोटी १६ लाख २० हजार ८ रु ठेव स्वरूपात स्वतःकडे घेवून फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना कसलाही परतावा न देता विश्वास संपादन करून फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात १) रमेश पुंजाजी आहेरकर २) एक महिला ३) वेदांत रमेश आहेरकर ४) आदीत्य रमेश आहेरकर हे सर्व माण येथील राहणारे आरोपी आहेत. सबंधित प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पांचाळ पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा