Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

५२ कोटी देयके प्रकरणी सर्व दोषींवर कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करा___ मारुती भापकर (माजी नगरसेवक)

 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १० एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य लेखापाल प्रवीण जैन यांनी आथिंक तरतुद नसताना,मा.आयुक्त,मा‌.स्थायी समिती,मा. महापालिका सभा यांना फाट्यावर मारून त्यांनी व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, ठेकेदार , सल्लागार व काही नगरसेवकांनी सुमारे ५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आर्थिक देवाणघेवाण करून बेकायदेशीर अदा केली. या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून या गंभीर प्रकरणातील सर्व दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर फौजदारी गुन्हे दाखल होणे बाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पोलीस आयुक्त, विनय कुमार चौभे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार करून मागणी केली आहे.

मारुती भापकर आपल्या पत्रात पुढीलप्रमाणे म्हणणे मांडून स्पष्ट करतात की, "पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, महापालिकेच्या तिजोरीवर चक्क लेखा विभाग,काही अधिकारी , काही ठेकेदार व काही नगरसेवक यांनी संगनमताने दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी सर्व प्रशासकीय नियम,कायदे धाब्यावर बसवून ५२ कोटींहून अधिक रक्कमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली आहेत. या गंभीर भ्रष्टाचाराप्रकरणी प्रवीण जैन व यामध्ये संगणमत करून सामील असलेल्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा.

या प्रकरणाची भीषणता इतकी मोठी आहे की, सन २०२६-२७ चे अधिकृत बजेट मा. महापालिका सभेत मंजूर झालेले असताना आणि त्यामध्ये संबंधित कामांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसतानाही ३० मार्च ३१ मार्च २०२६ या अखेरच्या कालखंडात सुमारे६०ते ७०  विविध विभागांचे कामांची बिले रात्रीतून काढण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या पाणी पुरवठा, स्थापत्य, बीआरटी, नाशिक फाटा, मोशी रस्ते, तळवडे आणि भोसरी यांसारख्या विभागांची ही कामे होती, त्या विभाग प्रमुखांना (HOD) ला या व्यवहाराची साधी पुसटशी कल्पनाही देण्यात आली नाही. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या विभातिल नगरसेवकांना सह्या दिल्या तरच बिल मिळतील" अशी अट घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.जवळपास १५ ते २० नगरसेवकांनी देखील वीजेच्या चपळाईने या उपसूचनांवर सह्या केल्या. महापालिकेचा सन २०२६-२७ अर्थसंकल्पाच्या सभेत उपसूचनासह हा अर्थसंकल्प मंजूर झालेला असताना या नगरसेवकांच्या बेकायदेशीर उपसूचनांचा आधार घेऊन ही कोट्यवधींची खैरात करण्यात आली, त्या उपसूचनांवर साधी तारीखही नाही. तसेच यातील काही नगरसेवकांच्या सह्या बनावट असण्याची शक्यता देखील आहे. महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असल्याचे भासवणाऱ्या प्रवीण जैन यांनी चक्क 'बँक ऑफ बडोदा' मधील मुदत ठेवी (FD) कोणतीही अधिकृत बिडिंग प्रक्रिया न राबवता परस्पर मोडून ठेकेदारांचे खिसे भरले आहेत.

या महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन, संबंधित अधिकारी व काही नगरसेवक आहेत.

बुधवार दि‌.८/४/२०२६ रोजी स्थायी समिती सभा संपल्यानंतर  स्थायी समिती सभापती मा.श्री अभिषेक बारणे यांनी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमिक व प्रिंट माध्यमांवर बोलताना वरील संपूर्ण गंभीर माहिती दिली.ती काल गुरवार दि.०९/०४/२०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे‌.त्यामुळे या प्रकरणाबाबत खालिल मुद्द्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. 

१) या प्रकरणाबाबत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे कायदे सल्लागार श्री राजेश आगळे यांना अभिप्राय मागितला. कायदे सल्लागार श्री आगळे यांच्या मतानुसार त्यामध्ये वाढ व घट या नावाखाली देण्यात आलेल्या उपसूचना कायदेशीर की बेकायदेशीर ?

२)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या हि ६० ते ७० कामे नक्की झाले किंवा कसे?

२)लेखापाल व वित्त अधिकारी श्री जैन यांनी मा. महापालिका सभा, मा. स्थायी समिती सभा,मा. आयुक्त यांची मान्यता न घेता परस्पर आर्थिक वर्गीकरणाचा निर्णय घेणे,बजेट तरतूद नसताना सुमारे ५२कोटी पेक्षा अधिक रक्कम संबंधित ठेकेदारांना अदा केली किंवा कसे?ते मा. महापालिका सभा, मा. स्थायी समिती सभा, मा. आयुक्त परस्पर असा निर्णय घेऊ शकतात का?

३) बँक ऑफ बडोदा मधील मुदत ठेवी(एफ.डी.) कोणतीही अधिकृत बिडिंग प्रक्रिया न राबवता परस्पर,मा. महापालिका सभा, स्थायी समिती सभा, आयुक्त यांची मान्यता न घेता त्या मोडून दुसऱ्या बँकेत टाकल्या अथवा ठेकेदाराची बिले अदा केली किंवा कसे ?

४) या कामांच्या बिले अदागीसाठी सुमारे १५ ते २० नगरसेवकांच्या स्वाक्षरी खऱ्या कि बनावट? लेखापाल प्रवीण जैन हे मा.स्थायी समिती किंवा मा.महापालिका,मा.आयक्त नाहीत. हे स्वाक्षरी करणार्या नगरसेवकांना माहिती असताना हे नगरसेवक अशा सह्या करतातच कसे? या मागची नक्की कारणे काय?

५) महापालिकेचे मुख्य लेखापाल प्रवीण जैन, ६० ते ७० कामासंबंधीत अधिकारी, ठेकेदार,सल्लागार, पदाधिकारी नगरसेवक यांचे याप्रकरणी संगणमत होते का, यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली किंवा कसे?

हा केवळ तांत्रिक घोळ नसून महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी,नगरसेवक ,ठेकेदारांनी संगनमताने टाकलेला थेट दरोडाच म्हणावा लागेल. नवीन वर्षाचे बजेट मंजूर असताना, त्यात कोणतीही तरतूद नसताना मा. स्थायी समिती, मा. महापालिका सभेला फाट्यावर मारून  सुमारे ५२ कोटी रुपये परस्पर वाटलेच कसे जातात? प्रवीण जैन यांनी प्रशासकीय शिस्तीचा भंग केला, तसेच मा‌. स्थायी समिती व मा. महापालिका सभा यांना फाट्यावर मारून त्यांनी व पदाधिकारी अधिकारी ठेकेदार सल्लागार नगरसेवक यांनी संगणमत करून हा गंभीर गुन्हा केला आहे. या गंभीर प्रकरणाची आपण  तातडीने सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवावा.तसेच प्रवीण जैन यांच्या मागील चार वर्षाच्या कालखंडात त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची देखील चौकशी करावी यातील सर्व दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर कलमे लावून तातडीने फौजदारी गुन्हा नोंदवावा. जर तातडीने ही कारवाई झाली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल. कृपया या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी अशी नम्र विनंती मारुती भापकर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा