Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार ___ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही 

मंत्री आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या 
उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 
राष्ट्रीय अधिवेशन उदगीर येथे संपन्न 

| सांगावा न्यूज | उदगीर (जिल्हा लातूर), दिनांक २२ : 
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात बोलत होते. १८ आणि १९ एप्रिल रोजी दोन दिवसीय लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यतीत केले. तसेच विविध विषयांची चर्चा सत्रे, मुलाखती व सांस्कृतिक कार्यक्रमाने अधिवेशनाची सांगता झाली.

पहिल्या दिवशी शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, आ. संजय बनसोडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख, किरण नाईक, परिषदेच अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त शरद पाबळे, पुप् विभागीय अधिस्वीकृती समितीच अध्यक्ष हरीष पाटणे, सदस्य चंद्रसे जाधव, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, महिला आघाडीच्य अध्यक्ष शोभा जयपूरकर डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यध अनिल वाघमारे, जिल्हाधिकार भारत बस्तेवाड, जिल्हा प्रमुख अमोल तांबे, उदगीरच्या नगराध्यक्षा स्वाती हुडे, प्राचार्य डॉ. सुधीर जगताप उपस्थित होते.

"मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसल म्हणाले, पत्रकारांच्या संरक्षणाच्च कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्याच कारकिर्दीत आला या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी एस. एम. देशमुख यांनी केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुराव करू"

या दोन दिवसीय अधिवेशनात महाराष्ट्रातून जवळपास १५०० पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि हितासाठी मातृ संस्था अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद दर दोन वर्षांनी असे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करीत असतात. यंदाच्या अधिवेशनात आमदार रोहित पवार यांची शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतलेली मुलाखत तसेच विविध टीव्ही न्यूज चॅनेल आणि न्यूज पेपर चे पत्रकार यांची वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा आणि पत्रकारांच्या हिताचे निर्णय यावर सकारात्मक चर्चा या अधिवेशनात झाल्या. 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या या अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहरातील, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सागर गोपाळ (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ), विनय सोनवणे (अध्यक्ष, डिजिटल मिडिया परिषद, पिंपरी चिंचवड), गणेश मोकाशे (परिषदेचे राज्य उपाध्यक्ष) महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी , संतोष गोतावळे, मारुती बानेवार, अविनाश आदक, अनिल वडघुले, चिराग फुलसुंदर, रेखा भेगडे, प्रज्ञा अबनावे, इत्यादी पत्रकार अधिवेशनात सहभागी झाले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा