Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश तर प्रमोद भोसले यांच्याकडे तात्पुरता अतिरिक्त कार्यभार


उप सूचनांच्या फेरफार द्वारे ५२ कोटींच्या चुकीच्या पद्धतीने देय देणे प्रकरण भोवलं !

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. ११ एप्रिल २०२६ :* पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, सन २०२५-२०२६ चे सुधारित व सन २०२६-२०२७ चे मूळ अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये वाढ/घट करून करण्यात आलेल्या बिल अदायगी तसेच मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य, वित्तीय शिस्तीशी संबंधित बाबींचा विचार करता, चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना पुढील आदेश होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. तसेच चौकशी प्रक्रियेत कोणताही प्रभाव पडू नये व कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे यासाठी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत प्रमोद भोसले, मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा