| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २७ एप्रिल २०२६ : शहरातली खराळवाडी येथील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून लोक सेवेची कामे ठेकेदारांकडून नीट आणि वेळेत होत नसल्यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. असे सांगून परिसरातील समस्यांचा पाढा लेखी स्वरूपात दिनांक १५ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांना, आणि लोकप्रतिनिधींना सुपूर्द केला आहे. आयुक्त साहेब, महापौर साहेब, स्थायी समिती सभापती साहेब यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देखील लेखी निवेदन देऊन नागरिकांच्या समस्यांचा आणि ठेकेदारांच्या चुकीच्या कामांचा आढावा सामाजिक कार्यकर्ते जमीर तांबोळी यांनी निदर्शनास आणून दिला.
बजरंगनगर संभाजीनगर अय्युब मुजावर पथरस्ता या ठिकाणी ड्रेनेज लाईन नवीन टाकण्यात आली असून काही ठीकाणी काम बरोबर झाले नाही. नवीन लाईनमध्ये माती साचण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पाईप कनेक्शनच्या वरील बाजूस नवीन पाईप लाईन टाकली आहे, तेथील सदर रस्ता कामामुळे पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच गाड्या नेण्यास त्रास होत आहे. अशा परिस्थितीत आतील रस्ता कधी दुरुस्त होणार असा संबंधित ठेकेदाराला सूचना वजा प्रस्ताव दिला आहे का? त्याचबरोबर परिसरातील काही ठीकाणी ड्रेनेजचे काम ठेकेदाराने केले नाही. सदर ते कार्य सोडून अयुब मुजावर पथ येथे त्यांनी काम चालू केले आहे. ही अतिशय वाईट सवय ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना झाली आहे म्हणून ठेकेदाराला कामाचा समाधानकारक दाखला आणि बिल कृपया देऊ नये असे ठाम मत जमीर तांबोळी यांनी लेखी स्वरूपात व्यक्त केले आहे.
स्थापत्य मार्फत चालू ड्रेनेजचे काम चालू असताना प्रभागामधील निवडून आलेले माननीय सदस्य हे फक्तू चालू कामाचे फोटो टाकुन, काम आम्ही चालू केले आहे अशी पोस्ट टाकतात. पण त्यांना फक्त स्वतः घरा शेजारील भाग सोडून प्रभागातील कामे कोणत्या पद्धतीने आणि कशी संथ गतीने चालू आहेत याची त्यांना काळजी नाही. तेथील नागरिकांच्या चालू कामा संदर्भात काही तक्रारी असतील ते माननीयांना माहीत नाही व पुढील काम कधी होणार? आमचा जाणे येण्याचा जो रस्ता पूर्ववत आहे तो कधी पुर्ण होणार? त्याबद्दल काही पोस्ट टाकत नाहीत. अशीही खंत व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर बजरंगनगर मधील संडासचे काम स्वच्छतेचे काम कोण बघते याची अधिकाऱ्यांना काळजी नाही. त्या संडासमध्ये फक्त तीन ते चारच बाथरूम व्यवस्थित आहेत. बाकी पूर्णतः खराब झालेले आहेत. तेथील स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये १००% शौचालय सुविधा असूनही सार्वजनिक संडास व्यवस्थेवर विनाकारण सफाईचा खर्च महानगरपालिका करत आहे. अशी ही बिनकामाची संडास व्यवस्था काढून तेथील जागा ताब्यात घेऊन आरोग्याचे ऑफिस कींवा इतर काही नागरिकांच्या उपयोगात येणारा प्रकल्प करता येईल. सदर संडास वरील टेरेसवर रात्री गांजा दारु पिऊन आरडाओरडा शिवीगाळ होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना खूप त्रास होत आहे. त्याचबरोबर पुढे ३० मीटर अंतरावर शौचालय देखील आहे. म्हणून कृपया करून हे अनाठायी संडास व्यवस्था त्वरित काढून टाकण्यात यावी ही नम्र विनंती करून आरोग्य विभागातर्फे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व्हे करून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जमीर तांबोळी यांनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा