Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, २१ जून, २०२६

सामाजिक बांधिलकी जोपासत श्रीटिकेल या खासगी कंपनीच्या २७५ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या  वाय.सी.एम.रूग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान संकलन कार्यक्रम

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. २१ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालयाच्या सहकार्याने पिंपरी औद्योगिक वसाहतीतील श्रीटिकेल कंपनीच्या  २७५ कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय.सी.एम. रुग्णालय रक्त केंद्रासाठी व पुणे शहरातील पूना हॉस्पिटल या  रक्तकेंद्राच्या वतीने

श्रीटिकेल कंपनीचे डॉ राजेश पांढरीपांडे यांच्यासह कंपनीतील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांसाठी एक सामाजिक बांधिलकी जपत अप्रत्यक्षरीत्या सेवा कार्यात सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण २७५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

यावेळी वाय.सी. एम. रुग्णालयाच्या रक्त केंद्राचे प्रमुख डॉ. तुषार पाटील म्हणाले की, श्रीटिकेल कंपनीप्रमाणे इतर कंपन्यांनी पुढे येऊन आपल्या कंपनीत रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. जेणेकरून आपल्या परिसरातील दाखल होणाऱ्या कामगारांना व गोरगरीब गरजू रुग्णांना खऱ्या अर्थाने  मदत होईल.

वाय.सी.एम. रुग्णालयाचे डॉ. मीना सोनवणे यांनी कंपनीमध्ये भेट देऊन तेथील अधिकारी कर्मचारी यांना वायसीएम रुग्णालयामध्ये रक्त व रक्त घटकांची किती आवश्यकता आहे, तसेच रक्तदात्यांना रक्तदान केल्याने आपल्या स्वतःला व समाजाला कशा रीतीने त्याचा फायदा होतो, यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

हे शिबिर यशस्वी करण्याकरिता वाय.सी.एम. रुग्णालय रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नीता घाडगे, डॉ. गणेश लांडे, डॉ. स्नेहा सूर्यवंशी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता  किशन गायकवाड, अश्विन कंजे, नर्सिंग ऑफिसर गीता चव्हाण, विपुल गायकवाड, रक्तकेंद्र तंत्रज्ञ वृषाली अमृतकर व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा