Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६

वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांची सामाजिक बांधिलकी


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ५१ हजारांची मदत

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी समर्पित करण्याचा आदर्श विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २ लाख ५१ हजार रुपयांचे योगदान दिले. या रकमेचा धनादेश त्यांनी नुकताच राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला.

वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा निर्णय आमदार गोरखे यांनी घेतला. राज्यातील काही भागांमध्ये शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करत असून, अशा परिस्थितीत बळीराजाला आर्थिक आधार देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

बुधवारी मंत्रालयात झालेल्या सदिच्छा भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमित गोरखे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगी समाजहिताला प्राधान्य देत राबवलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आणि इतर लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

संकटकाळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे हेच कर्तव्य

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, "संकटाच्या काळात आपल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे, हे मी माझे सामाजिक कर्तव्य मानतो. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याची परतफेड समाजसेवेच्या माध्यमातून करणे हेच माझे ध्येय आहे."

आमदार अमित गोरखे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातून स्वागत होत असून, वाढदिवसाला सामाजिक सेवेची जोड देणाऱ्या त्यांच्या या कृतीचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्व आणि लोकसेवेचा सकारात्मक संदेश समाजासमोर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा