Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६

कमी वजन, जादा दरवसुली अन् पावती गायब; अदिती भारत गॅस एजन्सीविरोधात ग्राहकाची तक्रार


काही एजन्सीकडून अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय होत असल्याचा दावा!

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ : घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात कमी वजन, निर्धारित दरापेक्षा जादा पैसे वसुली आणि पावती देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काळेवाडी मधील एका ग्राहकाने काळेवाडी येथील अदिती भारत गॅस एजन्सीविरोधात गंभीर आरोप केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित ग्राहकाच्या दाव्यानुसार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता एजन्सीच्या गोदामात सिलेंडरचे वजन केले असता निर्धारित वजनापेक्षा दोन किलो गॅस कमी असल्याचे आढळले. ग्राहकाने सतर्कता दाखविल्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला. तसेच, सिलेंडरची किंमत ९४५ रुपये असताना वितरण कर्मचाऱ्यांकडून १००० रुपये घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वजन आणि पावतीबाबत विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे.
संबंधित घडलेल्या प्रकारानंतर ग्राहकाने पुराव्यांसह भारत गॅस कंपनी आणि ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे. तसेच संबंधित एजन्सीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी माध्यमांना कळवले.

घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरीत्या गॅस भरण्याचे प्रकार काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाकड परिसरात घडत असल्याच्या तक्रारीही यापूर्वी समोर आल्या आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी काळेवाडी-वाकड-थेरगाव परिसरातील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटनाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर गॅस साठवणूक, वाहतूक आणि वितरणातील सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा पुरवठा विभाग, भारत गॅस कंपनी आणि वैधमापनशास्त्र विभागाने संयुक्तपणे अचानक तपासणी करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. सिलेंडरचे प्रत्यक्ष वजन, आकारण्यात येणारी किंमत, पावती वितरण आणि सुरक्षिततेच्या नियमांची पडताळणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्राहक पूर्ण पैसे मोजत असताना त्यांना निर्धारित वजनाचा सिलेंडर, अधिकृत दर आणि व्यवहाराची पावती मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी करून अनियमितता सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी. केवळ तक्रारींची नोंद न घेता तपासणीचा निष्कर्षही सार्वजनिक करावा, आणि दोषींवर पोलिस स्टेशमध्ये गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष आता पुरवठा विभाग आणि भारत गॅस कंपनी सबंधित अदिती भारत गॅस एजन्सीवर कारवाई करणार का, की ग्राहकांची होणारी कथित लूट अशीच सुरू राहणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा