Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

पुणे भीतीच्या छायेत ! भर रस्त्यावर माजी नगरसेवकाचा गोळ्या झाडून खून !

 

पुण्यात वनराज आदेकरांवर गोळ्या झाडून आरोपी पसार : आंदेकरांचा मृत्यू 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाला असून धारधार शस्त्राने वारही झाल्याची माहिती पुणे पोलीस सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा यांनी मिडियाशी बोलतांना सांगितली. आज दिनांक एक सप्टेंबर रोडी रात्री साडे नऊ च्या सुमारास पुणे शहरातील नाना पेठ येथे वनराज आंदेकर हे त्यांच्या एका नातेवाईका सोबत थांबलेले असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी चार ते पाच राऊंड गोळीबार फायरींग केल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनुष्य भर रस्त्यात अशाप्रकारे गोळीबार झाल्यामुळे पुणे शहर हादरून गेले असून सामान्य जनता भीतीच्या छायेखाली असल्याचे जाणवत आहे. गोळीबार नेमका कोणी केला आणि कशामुळे केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. जखमी आंदेकर यांना जवळच्या केईएम रुग्णालयात घेवून गेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सुरू असून आरोपींना पकडण्यावर अमाचे लक्ष असल्याचेही पुणे सह पोलीस आयुक्त उपायुक्त रंजन शर्मा यांनी माध्यमांना माहिती दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा