Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

समस्त पोलादपूर तालुका वासीयांच्या वतीने तसेच गुरुवर्य यांच्या शुभहस्ते राज पार्टे यांचा सत्कार सोहळा संपन्न

 

पोलादपूर तालुकावासीयांच्या वतीने आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष राज पार्टे यांचा सत्कार मुंबई घाटकोपर के.व्ही. के सार्वजनिक शाळा, साईनाथ नगर रोड, एल.बी.एस. रोड घाटकोपर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

 अनेक जणांनी राजकारणात येऊन आपल्या पदाचा वापर हा स्वतःसाठी केला पण राजकारणात येऊन पदाचा उपयोग हा कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि संकटात सापडलेल्या जनतेसाठी केला असे व्यक्तिमत्व म्हणजे राज पार्टे साहेब . ते नेहमीच सामान्य माणसासाठी लढत असतात. पोलादपूर तालुक्यातील महावितरण, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, एसटी डेपो येथे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. तसेच मुंबई येथे देखील मराठी माणसासाठी लढत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत पोलादपूर वाशियांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पार्टे साहेबांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. वारकरी संप्रदायातील गायनाचार्य मृदुंगाचार्य व सारेगम लिटिल चॅम्प्स फेम कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे यांचे सुश्राव्य भजन ऐकायला भेटले . कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यातील अनेक मान्यवर व गाव कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बोलताना पार्टे साहेबांच्या आजवरच्या कार्याबद्दल कौतुक केले. राज पार्टे साहेबांनी सर्व उपस्थित तालुक्यातील वारकरी , राजकीय मित्र परिवारांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश केसरकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा