सांगावा, पिंपरी चिंचवड. दि. १२ : गणपती बाप्पांच्या विविध मनमोहक मुर्त्यांचे दर्शन गणेश भक्तांना होत असते. तसेच दर वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळे वेगवेगळे सामाजिक विषय घेवून जन जगृतीपर जिवंत देखावे सादर करीत असतात. यंदा एक वेगळा आणि हटके विषय पाहायला मिळाला तो म्हणजे, बिजलीनगर युवा प्रतिष्ठान मंडळाने सादर केलेला ' भूमिपुत्रांनो जागे व्हा ! या मध्ये स्थानिक भूमिपुत्र शेतकरी पुत्र यांनी केवळ आपल्या वडिलोपार्जित संपत्तीची उधळपट्टी करून ऐश आराम न करता त्यांनी नोकरी उद्योग धंद्यात लक्ष घालून मार्गक्रमण केले पाहिजे. आज बाहेरचे लोक इथे येवून पडेल ते काम आणि वाट्टेल ते धंदे करून आपली प्रगती करतात. इथे येवून गडगंज प्रॉपर्टी कमावतात. याउलट त्यामानाने आपले काही भूमिपुत्र काम धंदा तर करीत नाहीत शिवाय वडिलोपार्जित साधनसंपत्ती विकून मौज मजा करतात. अशाच भरकटलेल्या भूमिपुत्रांना जागृत करणारा जिवंत देखावा म्हणजे, भूमिपुत्रांनो जागे व्हा : बिजलीनगर युवा प्रतिष्ठानने उत्तमरीत्या मांडला आहे. या लाईव्ह स्टेज शो मध्ये थिएटर द रायझिंग स्टार्स च्या कलाकारांनी उत्तम काम केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा